Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बिलाची पावती देण्यासाठी 10 हजारांची मागीतली लाच, लिपिकाला रंगेहात पकडले :, लाच लुचपतची कारवाई

बिलाची पावती देण्यासाठी 10 हजारांची मागीतली लाच, लिपिकाला रंगेहात पकडले :, लाच लुचपतची कारवाई 


सोलापूर : शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाच्या बिलाची पावती देण्यासाठी १० हजार रूपयाची लाच स्विकारताना, महापालिकेतील कनिष्ठ लिपीकाला रंगेहात पकाडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली असून, या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोपाळ सावरय्या मंदोल्लू (वय ४५ रा. जय प्लाझा अपार्टमेंट, होटगी रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. तक्रारदार हा एक ठेकेदार असून त्यांना ई-निवीदा प्रक्रियेद्वारे सोलापूर महानगरपालिका कार्यालयातील ए.सी. (एअर कंडिशन मशीन) बसविण्याचे काम मिळाले होते. ई-निवीदे प्रमाणे काम पूर्ण केल्यानंतर त्यांना शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाचे बील मंजूर होवून मिळाले होते. तक्रारदार कामाच्या बीलाची पावती मिळण्यासाठी मुख्यलेखापाल कार्यालयातील धनादेश विभागातील कनिष्ठ लिपीक गोपाळ मंदोल्लू यांच्याकडे पाठपुरावा करत होते.

बिलाची पावती देण्यासाठी गोपाळ मंदोल्लू यांनी तक्रारदारांना बीलाचा एक टक्का प्रमाणे १३ हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती १० हजार रूपये घेण्याचे मान्य केले. तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार महापालिकेत सापळा रचण्यात आला, पैसे घेताना लिपिकाला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, हवालदार अतुल घाडगे, सलिम मुल्ला, पोलिस शिपाई गजानन किणगी, राहूल गायकवाड यांनी पार पाडली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.