Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोविंद गोडबोले , शशांक लिमये नाटय परिषदेचे पुरस्कार जाहिर 14 जून रोजी मुंबईत होणार पुरस्कार सोहळा

गोविंद गोडबोले , शशांक लिमये नाटय परिषदेचे पुरस्कार जाहिर 14 जून रोजी मुंबईत होणार पुरस्कार सोहळा


सांगलीः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने रंगभूमिवरील उल्लेखनिय कार्याबद्दल सांगलीतील बालरंगभूमिच्या योगदानाबद्दल गोविंद गोडबोले यांना तर सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून शशांक लिमये यांना पुरस्कार जहिर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्या जेष्ठ अभिनेते अशोक सराफ,रोहिणी हट्टगंडी यांच्यासह विविध मान्यवरांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने नाट्यक्षेत्रातील विविध मान्यवरांना रंगभूमिवरील योगदानाबद्दल पुरस्कार जाहिर केले आहेत. या पुरस्काराचे वितरण 14 जून रोजी सायंकाळी चार वाजता मुंबईतील यशवंत नाट्य मंदिरात होणार आहे अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.
नाटककार  गोविंद  बल्लाळ  देवल यांच्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ नाट्य परिषदेने हा सोहळा आयोजित केला आहे. यात सर्वोत्कृष्ट निवेदकास श्रीमती शिवानी जोशी पुरस्कृत स्व.भालचंद्र त्र्यंबक जोशी स्मृती पुरस्कार  सांगलीतील नाट्य कलाकार, व निवेदक शशांक लिमये यांना जाहिर झाला आहे. लिमये यांनी आतापर्यत दीडशेहुन अधिक गाण्याचे, उद्घाटन समारंभ, वर्धापनदिन तसेच शताब्दि नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ यासह अनेक कार्यक्रमाचे निवेदन केले आहे. रंगभूमिवर गेली 25 वर्षे  लिमये कार्यरत आहेत.  

तसेच सांगली आकाशवाणीत बारा वर्षे विविध कार्यक्रमाचे निवेदन केले होते, तर कोरोना काळातसमाजातील विविध घटकातील   110 व्यक्तींच्या मुलाखती फोनवरुन घेतल्या होत्या.  तर बालरंगभूमिवरील योगदानाबद्दल  कालिंदी केळुस्कर पुरस्कृत अ.सी.केळुस्कर स्मृती पुरस्कार आकाशवाणीचे सेवा निवृत्त अधिकारी गोविंद गोडबोले यांना  जाहिर झाला आहे. गोडबोले यांनी लहान मुलांसाठी अनेक बालनाट्ये लिहिली, 1969 पासून बालरंगभूमिवर कार्यरत आहेत,शंभर हून अधिक बालनाट्ये लिहीली आहेत. सात पुस्तके प्रकाशित आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.