Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फोन चार्जिंगला लावलेला नसताना चार्जर प्लग इन असेल तर काय होत?

फोन चार्जिंगला लावलेला नसताना चार्जर प्लग इन असेल तर काय होत?


मोबाईल फोन हा आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचा घटक बनला आहे. आजच्या काळात अनेक महत्त्वाची कामं तुम्ही मोबाईल फोनवरून अगदी सहज करू शकता. केवळ कॉल आणि मनोरंजनच नाही तर आता बँकिंग, गुंतवणूक, रिचार्ज, पेमेंट अशा अनेक महत्त्वाची कामं हे स्मार्टफोनच्या माध्यमातून होऊ लागली आहेत. मात्र हा स्मार्टफोन जितका महत्त्वाचा आहे, तितकाच महत्त्वाचा त्याचा चार्जरही आहे. त्यामुळे आपण जेव्हा जास्त वेळ बाहेर जातो तेव्हा फोन सोबत चार्जर घेऊन जातो. 

अनेकांना त्यांचा फोन सतत चार्जवर ठेवण्याची सवय असते आणि त्यांचा चार्जर नेहमी सॉकेटशी जोडलेला असतो. बरेच लोक फोन चार्जिंगपासून काढून टाकतात, परंतु चार्जरला बोर्डवर प्लग इन करून सोडतात. पण असे करणे योग्य आहे का? असे केल्यावरही चार्जर वीज वापरतो का? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? तुमचे उत्तर हो असेल तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर देणार आहोत.
सॉकेटला जोडलेला चार्जर वीज वापरतो?

फार कमी लोक असतील जे चार्जर वापरात नसताना सॉकेटमधून काढून टाकतील. अन्यथा बहुतेक लोक ते सॉकेटमध्ये प्लग इन करून ठेवतात. एनर्जी सेव्हिंग ट्रस्टनुसार, कोणताही स्विच ऑन असताना प्लग इन केलेला चार्जर वीज वापरत असतो. तुमचे डिव्हाइस त्याच्याशी कनेक्ट केलेले असो किंवा नसो चार्जर वीज वापरत असतो. महत्त्वाचं म्हणजे यामुळे वीज तर वाया जातेत शिवाय हळूहळू चार्जरचे आयुष्य देखील कमी होते. एका रिपोर्टनुसार चार्जन प्लन इन असेल तर महिन्याला अंदाजे 130 वॅट आणि वर्षाला अंदाजे 1.5 किलोवॅट वीज वापरली जाते. त्यामुळे तुम्ही देखील चार्जर प्लग इन ठेवत असाल तर आता यापूढे वापर झाल्यानंतर तो काढून टाकायला विसरू नका. 

मोबाईल फोन चार्ज करताना घ्या ही काळजी
मोबाईल फोन कमी कालावधीसाठी चार्ज केल्याने त्याच्या बॅटरीच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तज्ञ फोन बॅटरीसाठी 40-80 नियम पाळण्यास सांगतात. ऑप्टिमाइझ केलेल्या बॅटरी आयुष्यासाठी तुमच्या फोनची बॅटरी कधीही 40 टक्क्यांपेक्षा कमी आणि 80% पेक्षा जास्त नसावी. याशिवाय काही वेळा लोक वेगवेगळ्या चार्जरने फोन चार्ज करतात. परंतु असे करणे कोणत्याही बॅटरीसाठी चांगले नाही. फोन नेहमी मूळ चार्जरनेच चार्ज करण्याचा सल्लाही तज्ञ देतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.