Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

24 तासात 2 तहसीलदारावर कारवाई! थेट मंत्राल्यातून आदेश :, काय आहे प्रकरण?

24 तासात 2 तहसीलदारावर कारवाई! थेट मंत्राल्यातून आदेश :, काय आहे प्रकरण?


अमरावती जिल्ह्यातील 2 तहसीलदारांवर 2 विविध घटनेत कारवाई झाल्याने जिल्ह्यातील महसूल प्रशासनात प्रचंड खडबड उडालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड यांना 25000 रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली तर अमरावती तालुक्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांना शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे.

24 तासात दोन तहसीलदारांवर कारवाई झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

चांदूरबाजार येथील तहसीलदार गीतांजली गरड यांनी शेतकऱ्याला फेरफार करण्यासाठी मध्यस्थ मार्फत 25 हजाराची लाच मागितली होती. अमरावतीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, लिपिक किरण बेलसरे यांनी स्वतः व तहसीलदार गीतांजली गरड यांच्याकरिता 25 हजाराची मागणी केली हे पडताळणीअंती सिद्ध झाले व आज बेलसरे व गीतांजली गरड यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार गीतांजली गरड व त्यांचा लिपिक किरण बेलसर या दोघांनाही अटक केलेली आहे.

विजय लोखंडेंच्या निलंबनाचे थेट मंत्रालयातून आदेश
रद्द केलेल्या लेआउटला परवानगी दिल्याप्रकरणी अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना महसूल विभागाने निलंबित केले आहे. अमरावतीच्या गोपालनगर येथील संजय गव्हाळे यांनी यासंदर्भातील तक्रार दाखल केली होती. वडद येथे टाकण्यात आलेल्या दोन लेआउटची मंजुरी महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी 23 जून 2023 रोजी रद्द केली होती. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 15 मार्च 2024 रोजी वडद येथील दोन्ही लेआउटच्या मंजुरीसाठी अमरावती मनपाचे सहाय्यक संचालक नगररचना यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आला होता. चौकशीत विजय लोखंडे हे दोषी आढळल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश थेट मंत्रालयातून निघाले. विजय लोखंडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. जिल्ह्यात आज दोन तहसीलदारांवर एकाच वेळी मोठ्या कारवाया झाल्याने महसूल विभागात खडबड उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.