Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

25 हजारांची लाच घेतांना महिला ग्रामसेवक ' लाचलुचपतच्या जाळ्यात

25 हजारांची लाच घेतांना महिला ग्रामसेवक ' लाचलुचपतच्या जाळ्यात 


करजगाव येथील तक्रारदार शासकीय कंत्राटदार असून, त्यांनी ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे तीन बांधकामे केली होती. या कामाचे व यापूर्वी केलेल्या एका कामाचे असे एकूण चार कामांच्या बिलाचे दहा टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल.


अमरावती : कामाच्या बिलातील 10 टक्के रक्कम लाच स्वरुपात  स्वीकारणाऱ्या एका महिला ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 21) अटक केली. वृषाली भुजंगराव दिवाण (42, ब्राम्हणवाडा गोविंदपूर, ता. जि. अमरावती) असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. ही कारवाई पंचवटी चौकातील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या गेटसमोर करण्यात आली.
करजगाव येथील तक्रारदार शासकीय कंत्राटदार असून, त्यांनी ब्राम्हणवाडा ग्रामपंचायतअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे तीन बांधकामे केली होती. या कामाचे व यापूर्वी केलेल्या एका कामाचे असे एकूण चार कामांच्या बिलाचे दहा टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल, त्याशिवाय तुमचे बिल काढणार नाही, असे म्हणून तेथील ग्रामसेविका वृषाली दिवाण यांनी लाचेची मागणी केली. याबाबत सोमवारी एसीबीला तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार एसीबी पथकाने 21 मे रोजी पडताळणी कारवाई केली असता, ग्रामसेविकेने लाचेची मागणी करून तडजोडीअंती 25 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.