Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देशभरात जमीन नामोल्लेख विशेष मोहीम सुरु. - शेखर गायकवाड

देशभरात जमीन नामोल्लेख विशेष मोहीम  सुरु. -   शेखर गायकवाड 


(यशदा कडून मार्गदर्शन, केंद्र शासनाकडून पाठबळ  )
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. राज्य प्रदेश बदलला की बोलीभाषा राहणीमान विशिष्ट भाषेतील  लय असे विविध अनुभव येतात त्याप्रमाणेच देशातील राज्य व प्रांतानुसार जमिनीच नाव बदलते. जमिनी ला प्रत्येक राज्यात आणि प्रभागात वेगवेगळ्या नावाने   संबोधले जाते. याचा  आढावा घेणारी विशेष  मोहीम  यशदाच्या मार्गदर्शनाखाली  राबवली जात आहे. केंद्र शासनाच्या प्रोत्साहनाने  देशभरात जमीन नामोल्लेख विशेष मोहीम  राबवली जात आहे. यासाठी प्रत्येक राज्यातील विशेष अधिकारी  व शिष्टमंडळाची निवड करण्यात आली आहे . अशी माहिती यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे शेखर गायकवाड यांनी दिली.  माहिती अधिकार  कार्यकर्ते शाहीन    शेख यांच्याशी विशेष भेट प्रसंगी यशदाचे  शेखर गायकवाड यांनी जमीन विषयीच्या नव्याने सुरु होणाऱ्या " जमीन नामोउल्लेख " उपक्रमा बाबत बोलताना माहिती दिली.

  
विविधतेत एकता  असणाऱ्या भारत  देशात  प्रामुख्याने शेतीला अधिक महत्त्व आहे. कृषीप्रधान देशातील जमीन  ही शेतकऱ्याची आणि राष्ट्राची  संपत्ती आहे. जमिनीचे संवर्धन आणि संगोपन  चांगल्या प्रकारे होऊन  शाश्वत सामाजिक विकासासाठी  संशोधन खूप गरजेचे आहे.  असे सांगून जमीन नाम उलेखाच्या  उपक्रमासाठी  केंद्र शासनाकडून  पाठबळ व प्रोत्साहन  देण्यात आले आहे. देशभरातील सर्व राज्यांच्या जमिनीच्या माहितीचा आढावा घेतला जाणार असून  यशदा पुणे च्या माध्यमातून या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
राज्यातील जनतेचा समतोल व शाश्वत विकास साधणाऱ्या लोकाभिमुख सुप्रशासनाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून सतत उत्तेजन देणे व सक्षम बनविणे हे यशदा चे ध्येय आहे.प्रशासकीय अधिकारी, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींना उपयोजित संशोधनावर आधारीत अनुभवसिद्ध ज्ञान, सुयोग्य तंत्रज्ञान व आवश्यक कौशल्य कल्पक प्रशिक्षण देण्यास कटिबद्ध आहे.   
 
सातबारावर नोंद असणाऱ्या  जमिनी च्या नावातील विविधता आढळते.  जमिनीच्या नावांच्या या बदलांचा  आढावा घेऊन शाश्वत विकासासाठी संशोधन वृत्तीने   याची नोंदणी करण्याचे काम यशदा चे शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यावेळी पत्रकार अमोल तुंगे, प्रदीप पोद्दार, महावीर, सारंग घोरपडे, पडळकर उपस्थित होते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.