Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

25 हजाराची लाच मागणाऱ्या महिला तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल

25 हजाराची लाच मागणाऱ्या महिला तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल 


पारोळा तालुक्यातील मौजे शिवर बिगर येथील तलाठी यांनी वीट भट्टी व्यवसाय करणाऱ्याकडे पंचवीस हजाराची लाच मागितली होती. तसेच लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. अखेर अँटी करप्शन ब्युरो धुळे यांनी तलाठी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पारोळा तालुक्यांतील मौजे शिवर दिगर येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते यांची तक्रारदार याने त्यांचा विटभट्टीचा व्यवसाय आहे त्यासंदर्भात भेट घेतली. वीट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतुक करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडून गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरीता २५ हजार रुपये जमा करून घेतले.


तलाठी काकुस्ते यांनी तक्रारदाराकडून 25 हजार रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर तकारदार यांनी गौण खनिज परवान्याची चौकशी करण्याकरीता तलाठी वर्षा काकुस्ते यांची भेट घेतली असता, त्यांनी तक्रारदार यांच्याकडे यापुर्वी दिलेल्या पैशांची पावती न देता त्याव्यतिरिक्त २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार दि.12. डिसेंबर 2023 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात केली. 
तक्रारीची १३ डिसेंबर २०२३ रोजी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान वर्षा काकुस्ते, तलाठी शिवरे दिगर यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याचदिवशी पुन्हा त्याचे पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांचेकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले म्हणुन त्यांचे विरुध्द पारोळा पोस्टे जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.