Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांनां सांगलीजवळ दरोडेखोरांनी लुटले

अंबाबाईच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांनां सांगलीजवळ दरोडेखोरांनी लुटले 


देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांना सांगलीच्या कळंबी येथे लुटल्याचा प्रकार समाेर आला आहे. सुमारे सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत नांदेड जिल्ह्यातील भाविकांना लुटले आहे. त्यांच्याकडील पैसे, दागिन्यांवर दराेडेखाेरांनी डल्ला मारला.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर येथील चंद्रकांत बाईंगडे आणि बाळजी पाटील हे आपल्या कुटुंबासह एका गाडीतून तुळजापूर, पंढरपूर दर्शन करून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले हाेते. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील मिरज तालुक्यातल्या कळंबी येथे एका पेट्रोल पंपावर हे सर्व जण रात्री विश्रांतीसाठी थांबले.


याच दरम्यान रात्री एकच्या सुमारास अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी येऊन बाईंगडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली आहे. या दरम्यान दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.