Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई,25 वर्षापर्यंत.....

अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई,25 वर्षापर्यंत.....


पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आता नवे अपडेट समोर येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह चौघांना अटक झालीय. तसंच अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या पबवर कारवाई करण्यात आलीय.

आता आरटीओकडूनही अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आलीय. न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन देताना काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्यात अपघात विषयावर निबंध लिहिणं, ट्राफिट कंट्रोलरसोबत १५ दिवस वाहतूक नियोजन करण्या याचा समावेश होता. दरम्यान, अल्पवयीन आरोपीला सज्ञान झाल्यानंतरही लगेच ड्रायव्हिंग लायसन मिळणार नाही. ड्रायव्हिंग लायसनसाठी त्याला २५ वर्षांपर्यंत वाट बघावी लागेल.

अल्पवयीन चालक असल्यास कठोर कारवाई
अल्पवयीन वाहनचालक असल्याचे गुन्हेही सातत्याने समोर येत असतात. त्याबाबतही सरकारने नवा नियम लागू केला आहे. त्यानुसार वाहनचालक अल्पवयीन असल्यास त्याला 25 हजारांचा दंड ठोठावला जाईल. तसंच त्याला 25 वर्षे वय पूर्ण होईपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना दिला जाणार नाही. अल्पवयीनाला वाहन देणाऱ्या वाहनमालकाची नोंदणी रद्द होणार आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेला नवा नियम 1 जूनपासून लागू होणार आहे. सरकारी सेवेतून जुनी वाहने रद्द केली जाणार आहेत. तर अल्पवयीन चालकावरही कठोर कारवाई केली जाईल. ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

गाडीची नोंदणीच नाही

अल्पवयीन मुलाने जी गाडी चालवली त्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने जी पॉर्श गाडी चालवली ती बंगळुरूहून पुण्यात आणण्यात आली होती. टॅक्स न भरल्यामुळे आरटीओने या गाडीची नोंदणी केली नव्हती, तरीही गाडी रस्त्यावर फिरत होती.

आरोपीला सज्ञान मानून शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न
पुणे पोलीस आयुक्तांनीन सांगितलं की, कोर्टाची बेल ऑर्डर सार्वजनिक आहे. त्यात आरोपी दारुचा व्यसनी असल्याचं सांगितलंय. त्यावर मला बोलणं योग्य वाटत नाही. हे स्पष्ट आहे की रविवारी दोन अर्ज केले. हा भयंकर गुन्हा आहे. यात ७ वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. त्याचे वय १६ वर्षाच्या वर आहे. त्यामुळे कलम १५ अंतर्गत त्यांना सज्ञान मानून शिक्षा व्हायला हवी. कायद्यात अशी तरतूद आहे. यात दोघांचा मृत्यू झालाय. अरुंद रस्त्यावर वेगाने वाहन चालवत होते. मद्यप्राशन करून त्यांनी हे कृत्य केल्यानं त्यांना गुन्हा दाखल व्हायला हवं. जोपर्यंत अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत रिमांड होमला पाठवावं अशी विनंती केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.