Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बर्फ घालून कणीक भिजवल्यास कशी होते चपाती? एकदा करून बघाच

बर्फ घालून कणीक भिजवल्यास कशी होते चपाती? एकदा करून बघाच 


चपातीसाठी गव्हाचे पीठ मळण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. तुमच्यासाठी ही युक्ती नक्कीच आश्चर्यकारक ठरेल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बर्फाने पीठ मळून घेतल्याने अत्यंत फायदे होतील.

अनेकदा आपल्या घरी बनवलेल्या चपाती या मऊ, फुगलेल्या आणि दीर्घकाळ ताज्या राहाव्यात असे आपल्याला वाटते, पण हे कसे करता येईल तेच आपल्याला कळत नाही. वास्तविक, पीठ मळण्याबाबत अनेक प्रकारच्या टिप्स दिल्या जातात, जसे की गरम पाणी घालून किंवा तूप वापरून पीठ मळणे, गव्हाचे पीठ चाळून घेणे अशा अनेक पद्धती असतात.

मात्र या लेखात आम्ही देत असणाऱ्या युक्तीने तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. तुम्ही बर्फाचे तुकडे घालून पीठ मळताना कधी ऐकले आहे का? जर नसेल तर येथे जाणून घ्या त्याचे काय फायदे आहेत आणि या पिठापासून कोणत्या प्रकारच्या चपात्या बनवल्या जातात.

तुमच्याही चपाती कडक होतात का?

चपातीसाठी पीठ मळून बाजूला ठेवल्यावर ते कडक होऊन काळे होऊ लागते. यामुळे केवळ चपाती बनवण्यात अडचण निर्माण होत नाही तर चपाती कडक होतात आणि नीट फुगतही नाहीत. अशा स्थितीत पीठ मळताना बर्फाचा वापर करणे योग्य ठरते. यामुळे तुम्हाला अनेक फरक दिसून येतील. तुम्हाला नक्कीच हे वाचून आश्चर्य वाटत असेल पण किमान एकदा नक्की प्रयोग करून पाहा.


बर्फाने कसे भिजवाल पीठ?

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात बर्फाचे तुकडे टाका बर्फाचे पाणी पूर्ण थंड झाल्यावर या पाण्याने पीठ मळून घ्या
या पीठापासून चपात्या बनवल्या की त्या मऊ तर होतीलच पण त्या चांगल्या फुगतात आणि काळ्या होणार नाहीत
जर तुम्ही जास्त वेळ चपाती डब्यात ठेवल्या तर कडक होणार नाहीत पण ताज्या असताना जितक्या चविष्ट लागतात तितक्याच थंड झाल्यावरही लागतील
फुगलेल्या चपातीसाठी टिप्स

फ्लफी आणि चविष्ट चपाती बनवण्यासाठी आणखी काही सोप्या टिप्स आपल्याला वापरता येतील. पीठ मळताना तुम्ही कोमट तेल किंवा तूपदेखील वापरू शकता. यामुळे पीठ मऊ होते आणि मळल्यानंतर कोरडे होत नाही. यामुळे रोट्याही मऊ होतात
साधारणपणे पीठ मळून काही वेळ बाजूला ठेवले जाते. पण, जर तुम्ही घाईघाईत पीठ मळून घेत असाल आणि जास्त वेळ बाजूला ठेवायला वेळ नसेल, तर मलमलचे कापड पाण्यात भिजवून ते पिळून पिठावर पसरवा. अशाप्रकारे पीठ झाकण ठेवून 4-5 मिनिटे ठेवा आणि नंतर गोळा तयार करून चपाती भाजून घ्या. फुगलेल्या चपाती अधिक काळ मऊ राहतील
मळल्यानंतर पीठ प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवले तरी पीठ कोरडे होण्याची समस्या येत नाही. पीठ प्लास्टिकच्या आवरणाने झाकून ठेवता येते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.