Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीला मिळणार 2 लाख रुपयाची मदत :, सरकारची नवी योजना?

पत्नीचा मृत्यू झाल्यास पतीला मिळणार 2 लाख रुपयाची मदत :, सरकारची नवी योजना?


राज्य सरकारकडून अनेक योजना लागू केलेल्या आहेत. यामध्ये सरकारने गोपीनाथ मुंडे अपघात योजना शेतकऱ्यांसाठी लागू केलेली आहे. या योजनेमध्ये अपघाती मृत्यूसह अनेक बाबींमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असते.

आता राज्य सरकारने या योजनेमध्ये महिलांना महत्त्वाचे स्थान देण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे प्रसूती दरम्यान जर एखाद्या शेतकरी महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत देण्याचे देखील सरकारने ठरवलेले आहे. परंतु मागील सहा ते सात महिन्याचा जिल्हास्तरावर याबाबत एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

सरकारने शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पत्नीचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्यास देखील या योजनेअंतर्गत दोन लाख रुपये मिळतात. यासाठी सरकारने दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तसेच कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून अर्ज देखील करावा लागतो.
प्रस्ताव कसा दाखल कराव्यात शेतकऱ्यांचा अपघात घडला आहे. त्या शेतकऱ्याने 30 दिवसाच्या आत आपला सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडून गाव नमुनाम, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र इत्यादी कागदपत्र. त्याचप्रमाणे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झालेला अहवाल,स्थळ, पंचनामा, पोलीस पाटील माहिती, अहवाल इत्यादी कागदपत्रे कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधून तिथे सबमिट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लाभ मिळेल.

योजनेचा लाभ कोणाला मिळणार 
पाण्यात बुडून अपघाती विषबाधा, वीज पडून, विजेचा धक्का बसून, सर्पदंश, उंचावरून पडल्याने, जनावरांच्या हल्ल्यात तसेच जनावर चावल्याने जखमी झाल्यास शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा या योजनेतून विमा मिळतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.