Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

होय, तो video माझाच, मला फेमस व्हायचं.:, व्हायरल Video मागील सत्य समोर

होय, तो video माझाच, मला फेमस व्हायचं.:, व्हायरल Video मागील सत्य समोर 


पुणे शहरातील अपघाताचं प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने मद्यधुंद अवस्थेत करोडो रुपयांची पोर्शे कार चालवली आणि त्या गाडीचा वेग इतका होता की, त्याखाली 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आता 14 दिवसांसाठी बालसुधार गृहात पाठवण्यात आलं आहे. परंतु, गुरुवारी मात्र या आरोपीचा रॅप साँग म्हटलेला एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जनमानसात संतापाची लाट उसळली होती. याच व्हिडीओबाबत आता एक सत्य समोर आलं आहे.व्हिडीओ आरोपीचा नाहीच

अपघाताच्या घटनेनंतर गुरुवारी अल्पवयीन आरोपीचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तो एक र‌ॅप साँग गात असल्याचे दिसले. व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. दोन व्यक्तींचा आपल्यामुळे जीव गेला याचा थोडाही पश्चाताप त्याला नसल्याचं अनेकांनी म्हटलं. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर आता या व्हिडीओमागचं सत्य समोर आलं आहे.

त्या व्हिडीओमागचं सत्य काय?
विशाल अग्रवाल यांच्या पत्नीने व्हायरल व्हिडीओ हा माझ्या मुलाचा नसल्याचं म्हटलं. माझा मुलगा रिमांड होममध्ये आहे, त्याने कुठलाही व्हिडीओ बनवला नाही, असंही त्यांनी सांगितलं. तर पुणे पोलिसांनीही पत्रकार परिषद घेत तो व्हिडीओ कार दुर्घटनेतील मुलाचा नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर, आता स्वत: मुलानेही याबाबतची कबुली दिली आहे. माझं नाव आर्यन निखरा असून मी दिल्लीतील रहिवाशी आहे. मी 22 वर्षांचा आहे आणि कंटेंट क्रिएटर असल्याचं म्हटलं आहे. आर्यन निखराने इन्स्टा स्टोरीवर आणखी एक व्हिडीओ अपलोड केला, ज्यामध्ये त्याने फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी व्हिडीओ बनवल्याचं सांगितलं. तसंच, त्याने फेक न्यूज देणाऱ्या माध्यामांवर ताशेरेही ओढले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.