Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महायुतीला बसणार मोठा फटका! रुचिर शर्मा यांचं मोठं भाकीत, अजितदादा आणि शिंदेचं काय होणार?

महायुतीला बसणार मोठा फटका! रुचिर शर्मा यांचं मोठं भाकीत, अजितदादा आणि शिंदेचं काय होणार?


गेल्या दोन दशकांपासून भारतीय निवडणुकांचा मागोवा घेणारे प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि लेखक रुचिर शर्मा यांनी असे भाकीत केले की, निवडणूक निकालानंतर सर्वात मोठे नुकसान भाजपच्या दोन मित्रपक्षांचे होणार आहे. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन पक्षांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश वगळता, बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपचे मित्रपक्ष यांची कामगिरी चांगली नाही.


शर्मा म्हणाले, सुमारे 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. महाराष्ट्रात जागांची विभागणी 50/50 होईल परंतु खरे नुकसान भाजपच्या दोन मित्रपक्षांचे (राष्ट्रवादी आणि शिवसेना) होणार आहे. ते इंडिया टुडेच्या कार्यक्रमात बोलत होते. औरंगाबाद, नाशिक आणि सोलापूर येथील पत्रकार आणि उद्योजकांच्या भेटीनंतर त्यांनी हा निष्कर्ष काढल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी आणि सेना या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर मतदारांसाठी महाराष्ट्राचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे - राष्ट्रवादी आणि सेनेच्या फुटलेल्या गटांतील नेत्यांच्या विरोधात असलेला राग लक्षात घेता, पश्चिम महाराष्ट्रात एनडीएचे मोठे नुकसान होऊ शकते, असे ग्राउंड रिपोर्ट्समधून लक्षात येते.

"आंध्र प्रदेशचा अपवाद वगळता, विशेषतः बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपच्या मित्रपक्षांची कामगिरी फारच खराब आहे. आंध्र प्रदेशचा अपवाद वगळता, बाकीच्या राज्यात मित्रपक्ष खरोखरच अडचणीत आहेत.'' असे शर्मा म्हणाले.

भाजपने बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू, कर्नाटकमध्ये एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएस आणि आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीशी युती केली आहे. कर्नाटकात भाजपला दोन कारणांमुळे झटका बसू शकतो - पक्षांतर्गत भांडण आणि काँग्रेसच्या कॅश ट्रान्सफर योजनेमुळे.

जागतिक गुंतवणूकदारांनीही महाराष्ट्राच्या आर्थिक घसरणीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, एकेकाळी महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत राज्य होते. महाराष्ट्र पहिल्या 10 मधून बाहेर पडला आहे आणि गेल्या 10 ते 15 वर्षांत बरीच घसरण झाली आहे. 

ते म्हणाले, "जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात प्रवास करता तेंव्हा मुंबई-नाशिक-पुणे या सुवर्ण त्रिकोणाच्या बाहेर, महाराष्ट्रातील सरासरी उत्पन्न भारताच्या राष्ट्रीय सरासरी उत्पन्नापेक्षा कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मोठी घसरण झाली आहे,"

शर्मा म्हणाले की, ''त्यांच्या टीमने या निवडणुकीत बीडसारख्या शहरांमधून प्रवास केला. कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्रातील रस्त्यांचा दर्जा खूपच वेगळा असल्याचे ते म्हणाले. गेल्या 10 ते 15 वर्षात कर्नाटकाप्रमाणे भारतातील कोणत्याही राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ झालेली नाही. गेल्या 10 ते 15 वर्षात महाराष्ट्रात जितकी तीव्र घसरण झाली आहे, तितकी घसरण कोणत्याही राज्यात झाली नाही.'' 
शर्मा म्हणाले की, देशात विषमता नेहमीच राहिली आहे. परंतु कोविड-नंतरच्या भारतात ही दरी वाढली आहे. मोदी सरकार करू शकलेली चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी भरपूर मोफत मोफत रेशन दिले आणि वितरण यंत्रणा खूप सुधारली आहे. भारतात शहरी-ग्रामीण विभागणी झाली आहे. संपत्ती आणि भारतातील उत्पन्नातील असमानता आज खूप विक्रमी उच्चांकावर आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.