Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; 2 सख्ख्या बहिणींसह तिघींचा मृत्यू

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; 2 सख्ख्या बहिणींसह तिघींचा मृत्यू

नांदेड : पैनगंगा नदीवर सहलीसाठी गेलेल्या मारेगाव (खा.) येथील एका कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली आहे. पोहत असताना मारेगाव शिवारात नदीच्या पाण्यात बुडून तिघींचा मृत्यू झाला. ही घटना 27 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. दोन बहिणींचा मृतामध्ये समावेश आहे. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता घटनास्थळावरून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी गोकूंदा उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे.

कशी घडली घटना?

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मारेगाव (खा.) येथील एक कुटुंब मारेगाव शिवारातील पैनगंगा नदीवर 27 मे रोजी सहलीसाठी गेले होते. पार्टी झाल्यानंतर नदीत ममता शेख जावेद (वय 21), पायल देविदास कांबळे (वय 16) व तिची बहीण स्वाती देविदास कांबळे (वय 13) व अन्य पोहण्यासाठी गेले होते. नदीत एकमेकांवर पाणी टाकत पोहण्याचा आनंद लुटत असतानाच यातील एक जण बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघीही बुडाल्या. यात तिघींचा बुडून मृत्यू झाला. पोहता येणारी एक महिला सुखरूप निघाली असून एकजण घटनास्थळावरून पळून गेल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेमध्ये दोन मुलींना गमावल्यामुळे कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला, सपोनि येवले, पोलीस उपनिरीक्षक गणेश घोटके, दत्तात्रय मामीडवार, पोहेकॉ संग्राम मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. एकाच कुटुंबातील दोन बहिणी व अन्य एक विवाहित महिला अशा तिघींचा पैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.