Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतातील 'या ' ठिकाणी अनेक भावांना असते एकच पत्नी

भारतातील 'या ' ठिकाणी अनेक भावांना असते एकच पत्नी 


अनेकदा काही पुरूषांनी एकापेक्षा जास्त लग्न केल्याच्या घटना नेहमीच समोर येत असतात. पण भारतात काही भाग असेल आहेत जिथे एक महिला एकापेक्षा जास्त पती करू शकते. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागांमध्ये बहुपती प्रथा आहे. ही प्रथा आता कमी झाली असली तरीही कायम आहे. दोन्ही राज्यातील काही भागांमध्ये आजही एक महिलेला पाच ते सात पती आहेत.

तुम्ही पाहिलं किंवा वाचलं असेल की, महाभारतात द्रोपदीने पाच पांडवांसोबत लग्न केले होते. आजच्या काळातही एका महिलेने पाच भावांशी लग्न केलंय. हिमाचल प्रदेशमध्ये ही प्रथा आजही पाळली जाते. इथे एक महिला परिवारातील एका पुरूषासोबत लग्न करते आणि नंतर तिचं लग्न पतीच्या सर्व भावांसोबतही होतं. हे सगळे मिळून पती-पत्नीसारखा संसार करतात. हिमाचलमध्ये बहुपती परंपरेनुसार, एकाच छताखाली राहणारे सगळे भाऊ एका तरूणीसोबत परंपरेनुसार लग्न करतात. जर महिलेच्या पतींपैकी एकाचं निधन झालं तर महिलेला दु:खं व्यक्त केलं देऊ देत नाहीत. "फारवर्ड प्रेस" याबाबत एक मुलाखत केल होती. ज्यानुसार अशा लग्नांना कायदेशीर मान्यता नाही. पण समाजात अशी स्थिती आहे की, त्यांना मान्यता मिळते. अशा लग्नांना ञमफो पोसमा म्हटलं जातं.

21 वर्षीय रजोने पाच भावांशी केलं लग्न
देहरादूनच्या एका गावात 21 वर्षीय रजोने पाच भावांशी लग्न केले. रजोने 2013 मध्ये या पाच भावांशी लग्न केले होते. अशाप्रकारे बहु पती प्रथा ही या भागात अनेक वर्षांपासून चालत आली आहे. या भागात एकाच महिलेसोबत लग्न करण्याची प्रथा सुरु होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे या भागात महिलांची संख्याही कमी आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात ही प्रथा आजही आहे.

यानुसारच रजोने पाच भावांशी लग्न केलंय. रजो आता काही मुलांची आई आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या मुलांचा वास्तविक पिता कोण आहे हे कुणालाही माहीत नाही. या परिवारात यावरुन कोणते वादही होत नाही. रजो आपल्या पाचही पतींसोबत आनंदी आहे. त्यासोबतच पाचही भाऊ रजोवर खूप प्रेम करतात. रजोला ही प्रथा बालपणापासून माहीत होती. कारण तिच्या आईचेही तीन पती होते. रजो आनंदी आहे कारण तिला तीन पतींचं प्रेम मिळतं.
कसं चालतं वैवाहिक जीवन?

लग्नानंतरचं वैवाहिक जीवन इथे एका टोपीवर निर्भर करतं. समजा लग्नानंतर कोणताही एक भाऊ पत्नीसोबत एकांतात असेल त्यावेळी खोलीबाहेर दरवाज्यावर एक टोपी ठेवतो. हे सगळे भाऊ मान मर्यादेचं इतकं भान ठेवतात की, दरवाज्यावर टोपी दिसली की जर कुणीही खोलीच्या आत जात नाहीत.

कुटुंबप्रमुख असते महिला

येथील एक खास बाब म्हणजे इथे पुरुष नाहीतर महिला घरातील प्रमुख असतात. त्यांच्याकडे पती आणि मुलांची योग्यप्रकारे काळजी घेण्याची जबाबदारी असते. पत्नीला इथे गोयने असं म्हटलं जातं तर पतीला गोर्तेस म्हणतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.