Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंग्लिशपेक्षा मराठी कठीण, 38 हजार 437 विद्यार्थी नापास

इंग्लिशपेक्षा मराठी कठीण, 38 हजार 437 विद्यार्थी नापास

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणावर भर दिला आहे. मात्र सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या परीक्षेतच गटांगळ्या खाल्ल्या आहेत. इंग्रजी प्रथम भाषा विषयापेक्षा मराठी प्रथम भाषा विषयात नापास होणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. राज्यातील 38 हजार 437 विद्यार्थी मराठी नापास झाले आहेत. मुंबई विभागातील मराठी नापासांची संख्या 4 हजार 670 एवढी आहे. राज्यातील 6738 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आहेत.

मुंबई विभागात दहावीची परीक्षा ही 58 विषयांसाठी घेण्यात आली होती. त्यातील 21 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. यामध्ये गुजराती, द्वितीय भाषा उर्दू, हिंदी-फ्रेंच द्वितीय आणि तृतीय भाषा, हिंदी-कन्नडा, हिंदी-तामिल, हिंदी-मल्यालम, हिंदी-बेंगाली आदी जोड विषयांच्या निकालांचा समावेश आहे. यासोबत व्यावसायिक अभ्यासक्रमातील हेल्थ केअर, अॅग्रीकल्चर, डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर, प्लंबर जनरल आदी विषयांचाही निकाल 100 टक्के लागला आहे.

निकाल वाढण्याची कारणे

प्रश्नांची काठिण्य पातळी कमी होती. परीक्षा काळात पोषक वातावरण. कोरोनानंतर अध्यापनाचा मोठा भर, अभ्यासक्रमातील त्रुटी कमी. परीक्षेसंदर्भात कोणताही बदलाचा निर्णय नव्हता. गणित विषयाचा निकाल 96.89 टक्के लागला आहे. 15 लाख 82 हजार 655 विद्यार्थ्यांनी गणिताची परीक्षा दिली. त्यापैकी 15 लाख 33 हजार 407 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सायन्स आणि टेक्नॉलॉजी विषयाचा निकाल गणितापेक्षा जास्त आहे. 97.03 टक्के विद्यार्थी या विषयात उत्तीर्ण झाले आहेत.

तर सोशल सायन्सचा निकाल गणित आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीपेक्षा अधिक असून 97.73 टक्के विद्यार्थी या विषयात उत्तीर्ण झाले आहेत. इंग्रजी विषयाचा निकाल 98.12 टक्के लागला. 3 लाख 59 हजार 229 विद्यार्थ्यांनी इंग्रजीची परीक्षा दिली. यापैकी 3 लाख 52 हजार 491 जण उत्तीर्ण झाले आहेत.

मुंबई विभागात मराठी विषयासाठी 1 लाख 6 हजार 256 जणांनी नोंदणी केली होती. परंतु परीक्षेला प्रत्यक्षात 1 लाख 5 हजार 322 जण बसले होते. त्यापैकी 1 लाख 652 जण उत्तीर्ण झाले असून उर्वरित 4 हजार 670 जण मराठीत नापास झाले आहेत.

10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठीची परीक्षा दिली होती. त्यात 10 लाख 55 हजार 715 म्हणजे 96.49 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हिंदी प्रथम भाषा विषयाचा राज्याचा निकाल 93.91 टक्के इतका लागला. 2381 विद्यार्थी हिंदीत नापास झाले. 39 हजार 110 विद्यार्थ्यांनी हिंदीची परीक्षा दिली त्यापैकी 36 हजार 729 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.