Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यात अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं चित्र आहे. पुण्यातील पोर्शे कारचं प्रकरण ताजं असतानाच आता पिंपरी- चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला चार चाकी (PCMC Accident News) गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुशील भास्कर काळे या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर या ठिकाणी घडलेली आहे. निलेश शिंदे आणि सुशील काळे याची गर्लफ्रेंड एकच आहे. सध्या त्या युवतीचे सुशील काळे सोबत प्रेमसंबंध असून ती निलेश पासून दूर झालेली आहे. निलेश या तिला त्रास देत होत असत त्या प्रेयसीच म्हणणं आहे. रात्री उशिरा एक्स बॉय फ्रेंड निलेश हा युवतीला भेटायला आला होता. याबाबतची माहिती तरुणीने सुशीलला दिली. निलेश जेव्हा भेटायला आला तो युवतीशी बोलत होता त्यावेळी सुशीलने चारचाकी गाडीने निलेशला उडवलं. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर अनेक लोकांनी मिळून पोलिसांना या अपघातासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलीस दाखल झाले आणि त्यांनी प्रियकराला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलीस सगळी माहिती घेत आहे. नेमका वाद फक्त गर्लफ्रेंडवरुन झाला की अजून कोणत्या कारणावरुन झाली आहे का? , याची माहिती घेत आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सुशील काळेला पिंपरी- पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात मागील काही दिवसांपासून बळजबरी करुन किंवा क्षृल्लक कारणावरुन अनेक राडे होताना पाहायला मिळत आहे. कधी माझ्याकडे डोळे वर करुन का पाहिलं तर कधी मी भाई आहे मला भाई म्हण, म्हणत एकमेकांवर कोयते हल्ले करताना दिसत आहेत. यातच प्रेम प्रकरणातूनदेखील अनेक राडे होताना पाहायला मिळतात. त्यातच आता एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला म्हणून प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली आहे. यात एक्स ब़ॉयफ्रेंड जखमी झाला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.