Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धनिक दिवट्याचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दिले , डॉक्टरांनी घेतले 3 लाखरुपये

धनिक दिवट्याचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दिले , डॉक्टरांनी घेतले 3 लाखरुपये 


कल्याणीनगर अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल  बदलणाऱ्या ससून रूग्णालयाच्या दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आलीय. ब्लड सँपल बदलल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर असं त्यांचं नाव आहे. अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी त्या अल्पवयीन मुलाला आणलं असता सँपल बदलण्यात आलं. पुणे पोलिसांनी इतर लँबमध्ये या मुलाचं डीएनए टेस्टिंग केल्यावर बिंग फुटलं. एवढच नाही तर धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितशे कुमार  यांनी ही माहिती दिली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 304 मधील गुन्ह्यात आता 120 ब अंतर्गत, 460, 213, 214 हे कलम लावण्यात आले आहेत. 19 तारखेला जे अल्पवयीन तरुणाचे ब्लड सँपल आले ते दुसऱ्याचे बल्ड सँपल असल्याचे निष्पन्न झाले आहे. गाडी चालवत असलेल्या तरुणाचे ब्लड सँपल घेतले ते फेकून दिले. दुसऱ्याचे ब्लड सँपल घेतले आणि त्या अल्पवयीन तरुणाचे नाव वापरले.

ससूनच्या डॉक्टरांचा पर्दाफाश
डॉ श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले. अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले. ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सँपल घेतले आहेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ससून हॉस्पिटलचे सगळे सीसीटिव्ही आम्ही तपासणार आहेत .
रक्ताचे नमुने बदलले

रक्ताचे नमुने बदल्यामुळे पहिल्या रिपोर्टमध्ये अल्पवयीन मुलगा दारू प्यायला होता हे निष्पन्न झालेच नाही. विशाल अग्रवाल आणि तावरे याचे संपर्क झाल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या हॉस्पिटलमधून आलेल्या रिपोर्टमध्ये सुद्धा अल्पवयीन तरुण दारू प्यायला नव्हता हे निष्पन्न झाले आहे कारण रक्ताचे नमुने उशिरा गेले.

डॉक्टरांचं बिंग कसं फुटले?
अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉ.अजय तावरे हे ससुन रुग्णालयाच्या forensic medicine and toxicology चे प्रमुख आहेत तर डॉक्टर श्रीहरी हरलोल हे अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. त्या मुलाचे ब्लड सँपल श्रीहरी हरलोल यांच्या विभागानं घेतले. मात्र त्यामध्ये दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर ते बदलायचे ठरवले. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी हस्तक्षेप केला. डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र तरीही तावरे यांनी ब्लड स्यांपल बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड सॅंपल टेस्टिंग साठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबला पाठवून DNA टेस्ट करायचं ठरवलं आणि डॉक्टरांचं बिंग फुटलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.