Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवडूणूक रोख्यामधून भाजपाला हजारो कोटींच दान :, आता पैशाआभावी कंपनीला विकवा लागणार व्यवसाय

निवडूणूक रोख्यामधून भाजपाला हजारो कोटींच दान :, आता पैशाआभावी कंपनीला विकवा लागणार व्यवसाय 


मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडचे (एमईआयएल) नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. निवडणूक देणग्यांबाबत चर्चेत आलेल्या या कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कंपनीला आपला व्यवसाय विकावा लागला आहे.

अहवालानुसार, मेघा इंजिनिअरिंग आपला सिटी गॅस वितरण व्यवसाय विकण्याचा विचार करत आहे. अहवालानुसार, मेघा सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनने त्यांचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कंपनीने सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंद्रपस्थ गॅस आदींशी संपर्क साधला आहे.

मेघा इंजिनिअरिंग ही हैदराबाद स्थित कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय हायड्रोकार्बन, इलेक्ट्रिक बस, संरक्षण, उर्जा, वाहतूक, उत्पादन यासारख्या विभागांमध्ये देखील पसरलेला आहे. मेघा सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन ही गॅस वितरण कंपनी आहे आणि मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. मेघा सिटी गॅसच्या प्रस्तावांवर काही कंपन्यांनी विचार केला असल्याचा दावा इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात करण्यात आला आहे. कंपनीच्या व्यवसायाची किंमत 1 ते 2 हजार कोटींच्या दरम्यान असू शकते.

मेघा इंजिनिअरिंग ही निवडणूक रोखे खरेदी करणारी दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर नुकतीच निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची नावे सार्वजनिक करण्यात आली. SBI ने दिलेल्या माहितीनुसार, Megha Engineering and Infrastructures Limited ने एकूण 966 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले होते. 

मेघा इंजिनिअरिंग आणि त्यांची समूह कंपनी, West UP Power Transmission Company Limited (WUPTL) यांनी मिळून भाजपला 664 कोटी रुपये दिले. WUPTL ने काँग्रेसला 110 कोटी रुपये दिले. MEIL ने BRS ला 195 कोटी रुपये दिले. टीडीपीला 28 कोटी आणि वायएसआरसीपी 37 कोटी रुपये देणगी दिली आहे.

मेघा इंजिनिअरिंगचा मालक कोण आहे?
मेघा इंजिनिअरिंगची स्थापना 1989 मध्ये मेघा इंजिनिअरिंग एंटरप्रायझेस म्हणून हैदराबादस्थित उद्योगपती पामिरेड्डी पिची रेड्डी यांनी केली होती. आंध्र प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, रेड्डी यांनी नगरपालिकांसाठी पाईप्सच्या निर्मितीसह उद्योग सुरू केला आणि नंतर त्यांच्या कंपनीने धरणे, नैसर्गिक वायू वितरण नेटवर्क, वीज प्रकल्प आणि रस्ते यासारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये विस्तार केला.

मेघाला 100 कोटींची उलाढाल होण्यासाठी एक दशक लागले. पण आता 40,000 कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी आहे, 20 हून अधिक देशांमध्ये पाय रोवणारी भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जेव्हा कंपनी सुरू झाली तेव्हा त्यात 10 पेक्षा कमी कर्मचारी होते. आता या 25 समूह कंपन्यांमध्ये दोन लाखांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.