Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अग्रवाल कुटुंबांमुळे माझ्या मुलाने जीवन संपवलं, बापाची तक्रार! आणखी एक तक्रारदार समोर...

अग्रवाल कुटुंबांमुळे माझ्या मुलाने जीवन संपवलं, बापाची तक्रार! आणखी एक तक्रारदार समोर...


अग्रवाल कुटुंबाविरोधात आता आणखी एक तक्रारदार तक्रारीसाठी पुढे आले आहेत. दत्तात्रेय कातोरे हे अग्रावाल कुटुंबाविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. दत्तात्रेय कातोरे हे अग्रवाल कुटुंबाच्या कंपनीत काम करत होते. अग्रवाल कुटुंबाकडे ८४ लाख ५० हजाराची थकबाकी आहे, असा आरोप दत्तात्रेय कातोरे यांनी केला आहे. पैसे मिळत नसल्याने आपल्या मुलाने गळफास घेतल्याचा गंभीर आरोप दत्तात्रेय कातोरे यांनी केला.

पुणे पोलिसांनी आवाहन केले होते की अग्रवाल कुंटुंबाविरोधात कुणाची तक्रार असेल तर समोर याव. दरम्यान पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आज अनेक तक्रारदार आले आहेत. पहिली तक्रार शिंदे गटाचे अजय भोसले यांनी केली होती. २००९ मध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता.
दत्तात्रेय कातोरे आज पोलीस आयुक्तलयासमोर आले होते. दत्तात्रेय कातोरे म्हणाले, मागील काही दिवसांपासून अग्रवाल कुटुंबाकडे बरेच पैसे जमा होते. ९ तारखेला माझा मुलगा त्यांच्या रेसेडेन्सी ऑफिसला गेला. तर त्याला उलट-सुलट उत्तरे देण्यात आली. त्याला हाकलून लावले. त्या टेन्शमध्ये येऊन माझ्या मुलाने घरी येऊन गळफास घेतला.

मी याबाबत एफआयआर करणार होतो. मात्र त्यांचे वकील चंदन पोलीस स्टेशनला आले. आम्ही तुमचे पैसे देतो म्हणून सांगितले. त्यांनी काही पैसे दिले. उर्वरीत पैसे देतो म्हणून सांगितले. मात्र अजून काहीही दिलं नाही. याप्रकरणी मला न्याय मिळावा, असे दत्तात्रेय कातोरे म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.