Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

8 व्या वर्षी पहिल्यांदा शारीरिक संबध! 365 बायका, मोलकरीणलाही सोडल नाही

8 व्या वर्षी पहिल्यांदा शारीरिक संबध! 365 बायका, मोलकरीणलाही सोडल नाही 


नवाब वाजिद अली हे अवधमधले शेवटचे राजे होते. मात्र ते त्यांच्या 365 पत्नी व मुलांमुळे चर्चेत राहिले. त्यांचे लहानपणापासून स्त्रियांशी संबंध होते व 18 व्या वर्षाचे होईपर्यंत त्यांनी इतक्या स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवले, की त्याची संख्या त्यांनाही लक्षात नव्हती.
वाजिद अली शाह हे 1847 मध्ये गादीवर बसले व 1856 ला इंग्रजांनी गादीवरून हटवेपर्यंत ते तिथे आरूढ होते. रूपा प्रकाशनाच्या सुदिप्ता मित्रा यांनी लिहिलेल्या 'अ नवाब अँड अ बेगम' या नव्या पुस्तकात त्यांनी वाजिद अली शाह यांच्याबद्दल लिहिलं आहे. शाह यांचा जन्म 30 जुलै 1822 रोजी फरहत बख्त पॅलेसमध्ये झाला. त्यावेळी पावसाळा होता.

वाजिद अली यांच्या जन्मानंतर त्यांची आई आलिया बेगम यांनी शाही ज्योतिष्यांना बोलावून मुलाचं भविष्य जाणून घेतलं. मुलाच्या पत्रिकेत ग्रह-नक्षत्र योग्य नसल्याचं ज्योतिष्याने सांगितलं. सगळ्या संपत्ती आणि राज्याचा त्याग करून ते संन्यासी बनतील असं त्यांचं भविष्य वर्तवण्यात आलं. त्यावर ज्योतिष्याने एक उपायही सांगितला. त्यांच्या प्रत्येक वाढदिवशी त्यांना संन्याशासारखी भगवी वस्त्रं परिधान केली तर ग्रह-नक्षत्र बदलू शकतात.
त्याची दखल घेत आलिया बेगम यांनी छट्ठीच्या (बाळाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी होणारा उत्सव) उत्सवात नवाब शाह यांना संन्यासाचे कपडे घातले. त्यानंतर प्रत्येक जन्मदिनी ते संन्याशाप्रमाणे भगवी वस्त्र परिधान करत असत. त्यांचा जन्मदिनही खासगी लोकांच्या उपस्थितीत साजरा होत असे. बाहेरच्यांना त्यात येण्याची परवानगी नसायची. 24 व्या जन्मदिनी जेव्हा ते राजगादीवर बसले, तेव्हापासून नवाबांनी काही जवळच्या व्यक्तींना वाढदिवसाला बोलवायला सुरुवात केली. तसंच अवधमध्ये जत्राही भरवण्यास सुरुवात केली. ते कोलकाता इथं जाईपर्यंत ती जत्रा सुरू होती. नवाब वाजिद अली शाह यांची आई आलिया बेगम दिल्लीच्या एका शाही कुटुंबातून आल्या होत्या. त्या जितक्या सुंदर होत्या, तितक्याच उच्चशिक्षित होत्या. सफाईदारपणे त्या फारसी बोलायच्या. स्वतःप्रमाणेच त्यांनी मुलालाही शिक्षण दिलं. मात्र नवाबांच्या चंचल स्वभावाची त्यांना चिंता वाटायची.

नवाब वाजिद अली शाह यांचा स्वभावही त्याला कारणीभूत होता. स्त्रियांच्या बाबतीत नवाब फारच रंगेल स्वभावाचे होते. त्याबाबत सुदिप्ता मित्रा त्यांच्या पुस्तकात उल्लेख करतात. वाजिद अली जेव्हा आठ वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा एका महिला सेविकेशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर ते त्यांच्या आईची मदतनीस असलेल्या एका महिलेच्या प्रेमात पडले. ती 35 वर्षांची होती. जवळपास तीन वर्षं त्यांचं प्रेमप्रकरण चाललं. 11 वर्षांचे झाल्यावर वाजिद अली बन्नो साहेब नावाच्या महिलेच्या प्रेमात पडले. मात्र तिचं आधीच लग्न झालं होतं, त्यामुळे तिच्याशी त्यांना शारीरिक संबंध ठेवता आले नाहीत. त्यानंतर बन्नोची बहीण हाजी खानम हिच्या ते प्रेमात पडले. तिचंही लग्न झालं होतं, मात्र तिनं ते मोडलं. नवाब 14 वर्षांचे होईपर्यंत तिनं त्यांच्याशी नातं कायम ठेवलं.

18 वर्षांचे होईपर्यंत वाजिद अलींनी इतक्या स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवले होते, की नेमकी संख्याही त्यांना लक्षात राहिली नाही. इतिहासकार रोझी लेव्हलीन जोन्स यांनी त्यांच्या 'द लास्ट किंग इन इंडिया : वाजिद अली शाह' या पुस्तकात वाजिद अली शाह यांच्या आयुष्याबद्दल लिहिलंय. 1857 च्या उठावाआधी नवाब वाजिद अली शाह यांना इंग्रजांनी त्यांच्या गादीवरून हटवलं व कोलकाताच्या विल्यम फोर्टमध्ये एका बंगल्यात राहण्यास पाठवलं. त्या बंगल्याचं नाव सुल्तान खाना असं नवाबांनी ठेवलं. नवाबांचा तो बंगला अनेक किलोमीटर क्षेत्रफळात पसरला होता. मात्र नवाबांच्या 365 राण्या, त्यांची मुलं, आचारी, नोकर-चाकर यांना राहण्यासाठी तो अपुरा पडू लागला. त्यामुळे नवाबांना सुल्तान खानाच्या जवळचे आणखी दोन बंगले भाड्यानं घ्यावे लागले.
इंगज सरकार नवाब वाजिद अली शाह यांना दरमहिना एक लाख रुपयांचा भत्ता देत होतं. मात्र तेवढे पैसेही नवाबांना पुरत नव्हते. नवाबांची एक बेगम माशूक महल यांच्या मुलानं इंग्रजांकडे तक्रार केली, की नवाब त्याच्या आईला जगण्यासाठी आवश्यक पैसे देत नाहीत. त्यावर इंग्रज सरकारनं नवाब अली शाह यांना बेगमचा भत्ता महिना 2500 रुपयांनी वाढवण्याचा आदेश दिला. असं रवि भट्ट यांनी 'द लाइफ अँड टाइम्स ऑफ द नवाब्ज ऑफ लखनऊ' या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. या गोष्टीवर अत्यंत नाराज झालेल्या नवाबांनी त्यांच्या 27 राण्यांना एकाच दिवशी एकाच वेळी 'तलाक' दिला. त्यांचा खर्च परवडत नसल्याचं नवाबांनी कारण दिलं होतं. नवाब वाजिद अली शाह त्यांच्या प्रेमसंबंधांमुळे कायमच चर्चेत राहिले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.