Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :-पुलवामा हल्ल्यात गुन्हा दाखल झाल्याची धमकी देत 32 लाख उकळले, वृद्धाला सायबर भामट्याचा गंडा

मुंबई :-पुलवामा हल्ल्यात गुन्हा दाखल झाल्याची धमकी देत 32 लाख उकळले, वृद्धाला सायबर भामट्याचा गंडा 


आजकाल सायबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून त्यामुळे नागरिक धास्तावल आहेत. वाढत्या गुन्ह्यांचे हे प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखीचे कारण बनले आहे. कठोर उपाययोजना, नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केल्यानंतर सायबर भामटे काही ना काही नव्या क्लुप्त्या लढवून लोकांना लुटतच आहेत.
त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नवी मुंबईतही घडला असून एका वृद्ध नागरिकाला 32 लाख रुपय गमवावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. पुलवामा येथील हल्ल्यात सहभागी असल्याचे सांगून कारवाईचा धाक दाखवत वृद्ध व्यक्तीला धमकावले आणि त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. नवी मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शरद पाटील (वय 82)असे पीडित वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी २ अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पाटील हे सीवूड येथील ची सेक्टर ५४ मधील एनआरआयवे कॉम्प्लेक्समध्ये राहतात. गेल्या रविवारी त्यांना दोन भामट्यांनी फोन केला. तुमचा पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले. देशद्रोह आणि ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात तुम्ही फरार आरोपी आहात असे सांगून अटक टाळायची असेल तर तुम्ही आम्हाला पैसे द्या असे सांगितले. आणि वेगवेगळ्या खात्याद्वारे त्यांच्याकडून 32 लाख रुपये उकळले आहे. काही दिवसांनी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि पाटील यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. नवी मुंबई सायबर सेल पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.