Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमेरिकेकडून भारतात राहणाऱ्या मुस्लिमांबद्धल वादग्रस्त विधान :, मोदींच्या कारकिर्दीवर भाष्य

अमेरिकेकडून भारतात राहणाऱ्या मुस्लिमांबद्धल वादग्रस्त विधान :, मोदींच्या कारकिर्दीवर भाष्य 


पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालात दावा करण्यात आला होता की, 'भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढली आहे, मात्र अमेरिका अजूनही धार्मिक स्वातंत्र्याबाबत भारतावर प्रश्न उपस्थित करत आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख प्रकाशित झालाय, ज्यावर अमेरिकेने तिखट प्रतिक्रिया दिली. भारतातील मुस्लिमांच्या परिस्थितीवर न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालावर अमेरिकेने,”ते या विषयावर भारतासह जगभरातील देशांशी बोलत आहे. युनायटेड स्टेट्स धार्मिक स्वातंत्र्यासाठी सार्वत्रिक आदर वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.” असे म्हटले आहे.

धर्मनिरपेक्ष अन् लोकशाही कमकुवत 

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी, “आम्ही जगभरातील प्रत्येकाच्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. मिलर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून भारतातील धर्मनिरपेक्ष संरचना आणि मजबूत लोकशाही कमकुवत झाली आहे.” असे खळबळजनक विधान केले आहे. प्रकाशित अहवालात असा दावा करण्यात आला आहे की “भारतातील मुस्लिम कुटुंबे वेदना आणि एकटेपणाने त्रस्त आहेत. ज्या देशात त्यांच्या अस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्या देशात ते मुलांचे संगोपन करण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. भारतातील मुस्लिम लोकसंख्येमध्ये 43.15 टक्के वाढ नोंदवली गेली आहे, परंतु अमेरिका अजूनही प्रश्न उपस्थित करत आहे.
हा अहवाल अमेरिकेला आरसा दाखवेल Us On Muslim In India । 
नुकताच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा अहवाल आला. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की,”भारतातील मुस्लिम लोकसंख्या 1950 मध्ये 9.84 टक्के होती, जी 2015 मध्ये वाढून 14.09 टक्के झाली. अशाप्रकारे 75 वर्षांत मुस्लिम लोकसंख्या 43.15 टक्क्यांनी वाढली. 1950 ते 2015 दरम्यान, बहुसंख्य हिंदू लोकसंख्येचा वाटा 84.68 टक्क्यांवरून 78.06 टक्क्यांपर्यंत वाढला, जो 7.82 टक्क्यांनी घटला आहे. अहवालात ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे, तर जैन आणि पारशी लोकसंख्येमध्ये घट झाली आहे.

पीएम मोदींनी केला पर्दाफाश Us On Muslim In India ।
पंतप्रधान मोदींनीही याच अहवालावर प्रकाश टाकत अल्पसंख्याकांना धोका असल्याची कथा खोटी असून त्याचा पर्दाफाश केल्याचा दावा केला. “जे गृहीतक केले जात आहे ते चुकीचे सिद्ध होत आहे.” असे त्यांनीम्हटले .

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.