🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बँक ऑफ महाराष्ट्रचे चोरट्यानीं ATM मशीनच पळवली :, चोरट्यानी आगोदर फोडला CCTV

बँक ऑफ महाराष्ट्रचे चोरट्यानीं ATM मशीनच पळवली :, चोरट्यानी आगोदर फोडला CCTV 


नांदेड : चोरट्यांकडून एटीएम मशीन आता टार्गेट केले जात आहे. गॅस कटरच्या सहाय्याने मशीन कापून त्यातील रोकड लांबविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात आता थेट एटीएम मशीनचा घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.
नांदेड  जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली आहे. मध्यरात्री ही चोरी झाली. बारड- भोकर मार्गावर मुख्य रस्त्यावरच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे. दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ही एटीएम (ATM) मशिन चोरून नेली. एटीएम मशीनची चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेरा फोडला. त्यामूळे नेमकी चोरी झाली कशी आणि चोरटे कोण याचा तपास लावने अवघड झाले.


रक्कमेबाबत अद्याप माहिती नाही

सदर मशीन  चोरीची घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलीस दाखल झाले असून पोलिसांना  घटनास्थळी मोठी दोरी आणि एक पोत आढळून आले आहे. याचा तपस सुरु असून एटीएम मशिनमध्ये रककम किती होती, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.