Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानें दोघांनां चिरडले तरुण -तरुणीचा मृत्यू

पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलानें दोघांनां चिरडले तरुण -तरुणीचा मृत्यू 


पुण्यातील कल्याणीनगरमध्ये रात्री 3 वाजण्याचा सुमारास आलिशान पोर्शे कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कार चालक बड्या बिल्डरचा मुलगा पुण्यातील कल्याणीनगरमध्ये रात्री 3 वाजण्याचा सुमारास आलिशान पोर्शे कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कार चालक बड्या बिल्डरचा मुलगा 'ते' कल्याणीनगर परिसरातील 'बॉलर'मध्ये पार्टी करुन घरी जात असताना घडली घटना

पुणे :  पुण्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात शनिवारी (दि.18) मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या आलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्यू झालेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. हा अपघात शनिवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास याप्रकरणी एका अल्पवयीन मुलावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पुणे शहरातील बड्या बिल्डरचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे . याबाबत अकिब रमजान मुल्ला याने फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र कल्याणीनगर परिसरातील 'बॉलर'मध्ये पार्टी करुन घरी जात होते. त्यावेळी कल्याणीनगर एअरपोर्ट रोडवर  नंबर प्लेट नसलेल्या एका आलिशान कारने दुचाकीला जोरात धडक दिली.

ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकी वरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा दूरवर फेकले गेले. रस्त्यावर जोरात आपटल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जांगीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु काही नागरिकांनी त्याला आडवून बाहेर काढून चोप दिला. पुढील तपास येरवडा पोलीस  करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.