Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरण, शवविच्छेदनातून चंक्रावून टाकणारी माहिती उघड

कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरण, शवविच्छेदनातून चंक्रावून टाकणारी माहिती उघड 


मुंबई पोलिस दलात  कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला  दिवसेंदिवस वेगळं वळण येत आहे. आता विशाल पवार यांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात विशाल पवार यांच्यावर विषप्रयोग झाला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा लोहमार्ग पोलिस तपास बंद करण्याच्या तयारीमध्ये आहे. १ मे रोजी कॉन्स्टेबल विशाल पवार यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी विशाला पवारचा पोलिसांनी जबाब नोंदवला होता. 

या जबाबात मोबाईल चोरांचा पाठलाग करत असताना सायन-माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दुल्ल्यांनी हल्ला केल्याचा विशाल पवारांनी दावा केला होता. तसंच चोरट्यांचा पाठलाग करताना त्यांनी आपल्याला विषारी इंजेक्शन दिल्याचा देखील दावा विशाल पवार यांनी मृत्यूपूर्वी केला होता. पण तपासामध्ये ही सगळी कहाणी बनाव असल्याचे उघड झालं होतं.
विशाल पवार यांनी ही सर्व रचलेली कथा असल्याचा पोलिसांना संशय होता. अशामध्ये आता शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांच्यावर विषप्रयोग झाला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय आता खरा ठरला आहे. अशामध्ये दारुचे अतिसेवन केल्यामुळे विशाल पवार यांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात मोबाइल चोरांनी आणि गर्दुल्यांनी केलेल्या कथित हल्ल्यावेळी विशाल पवार घटनास्थळी उपस्थित नसल्याचे सीसीटीव्हीत कॅमेऱ्याच्या तपासातून समोर आलं होतं. तसंच, विशाल पाटील यांनी जबाबत सांगितल्याप्रमाणे त्यांनी माटुंगा स्थानकावर रात्रभर काढण्याचे सीसीटीव्हीत दिसून आले नाही. हल्ल्याच्या वेळी आणि त्यानंतरचे ४ ते ५ तास विशाल पावर हे इतरत्र असल्याचे तपासातून समोर आले होते. त्यामुळे विशाल पाटील यांनी ही सर्व रचलेली कथा होती असा पोलिसांचा संशय होता आणि तो खरा ठरला. त्यामुळे पोलिस हे प्रकरण बंद करण्याच्या तयारीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.