Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींनी आमेठी रायबरेलीत प्रचार करणं टाळले

मोदींनी आमेठी रायबरेलीत प्रचार करणं टाळले 

देशातील रायबरेली आणि अमेठी या लक्षवेधी मतदारसंघात यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतल्या नाहीत. गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही मतदारसंघात रोड शो व सभा घेतल्या. रायबरेली व अमेठी या दोन्ही मतदारसंघांमध्ये उद्या सोमवारी मतदान होणार असून प्रचार शनिवारी संपला. परंतु या प्रचाराच्या दोन आठवड्यात पंतप्रधानांनी या दोन्ही मतदारसंघात प्रचार सभा किंवा रोड शो केले नाही. भाजपचे स्टारप्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वाधिक प्रचारसभा व रोड शो केले आहेत.

गांधी कुटुंबाचे बालेकिल्ले असलेले मतदारसंघ राहिलेल्या रायबरेली व अमेठीमध्ये मात्र त्यांनी यावेळी जाणे टाळले. यावेळी रायबरेलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी मैदानात आहेत तर अमेठीत गांधी कुटुंबाचे विश्वासू किशोरीलाल शर्मा लढत देत आहेत. या दोन्ही मतदारसंघातील प्रचाराची धुरा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी सांभाळली आहे. गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी अमेठीत प्रचार केला होता. स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. परंतु यावेळी दोन्ही लक्षवेधी मतदारसंघात प्रचाराला ते आले नाहीत. या दोन्ही मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपविली होती. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रायबरेलीत जाऊन राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. 

या दोन्ही मतदारसंघातील प्रचाराची धुरा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी सांभाळली आहे. गेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी अमेठीत प्रचार केला होता. स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. परंतु यावेळी दोन्ही लक्षवेधी मतदारसंघात प्रचाराला ते आले नाहीत. या दोन्ही मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोपविली होती. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रायबरेलीत जाऊन राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या दोन्ही मतदारसंघात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मंत्र्यांनी डेरा टाकला आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांनी या मतदारसंघात प्रचारासाठी येणे टाळले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.