Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! सांगलीत महिलेचे अपहरण करून लैगिकं आत्याचार :, बाप - लेकाविरोधात गुन्हा दाखल

धक्कादायक! सांगलीत महिलेचे अपहरण करून लैगिकं आत्याचार :, बाप - लेकाविरोधात गुन्हा दाखल 


सांगली : दूरच्या नात्यातील एका महिलेचे अपहरण केल्यानंतर पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवून त्याचे अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महेश राजाराम शेजुळ (वय ३०) व राजाराम शेजुळ (रा. मिरज एमआयडीसी, शहा-लुल्लानगर) या दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीत राहणाऱ्या विवाहितेला जून २०२३ मध्ये दूरच्या नात्यातील संशयित महेश शेजूळ याने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटजवळ गाठले. घरी काम आहे, असे सांगून मोटारीत बसवले. त्यानंतर घरी न नेता भोसे फाटा (ता. मिरज) येथील शिवनेरी लॉजवर नेले. तेथे पीडितेच्या पती व मुलांना ठार मारण्याची धमकी देत इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध ठेवले.
या प्रकारानंतर संशयित महेश याने तासगाव, कुपवाड येथील लॉजवर तसेच पीडितेच्या घरी जाऊनही इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. वेगवेगळ्या लॉजवर लैंगिक अत्याचार करताना संशयित महेश याने अश्लील फोटो व व्हिडीओ काढले. हे फोटो व व्हिडीओ राजू मुरगुंडे व परसू या नात्यातील लोकांना व्हॉट्सॲपवर पाठवून बदनामी केली. पीडितेने हा प्रकार संशयित महेश याचे वडील राजाराम यांना सांगितला. तेव्हा त्यांनीही, मुलासोबत रिलेशनमध्ये राहा, नाहीतर मुलांना व पतीला जिवंत मारण्याची धमकी दिली. तसेच संशयित महेश याने पीडितेला व तिच्या पतीला आकाशवाणी केंद्राजवळ काठीने मारून जखमी केले.

अखेर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार संशयित महेश शेजुळ व वडील राजाराम शेजुळ या दोघांविरुद्ध बलात्कार, मारहाण, शिवीगाळ, दमदाटीसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.