Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सातारा हादरलं! बहीण - भावाची हत्या, रस्त्यावर सापडले मृतदेह

सातारा हादरलं! बहीण - भावाची हत्या, रस्त्यावर सापडले मृतदेह 


सातारा : फलटण तालुक्यातील निंभोरे इथं सख्ख्या बहिण भावाची हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी निंभोरे गावच्या हद्दीत असणाऱ्या पालखी महामार्गावर नवीन उड्डाणपुलाच्या शेजारी दोघांचे मृतदेह आढळून आले होते.

दोघांची ओळख पटली असून ते पारधी समाजाचे असल्याची माहिती समोर आलीय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सीताबाई शिंदे आणि सुमित शिंदे अशी हत्या झालेल्या बहीण भावाची नावे आहेत. बहिणीचं वय ३० तर भावाचं वय १६ वर्षे इतकं होतं. सकाळी दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांच्या शरिरावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले होते.
दुहेरी खूनाच्या घटनेने फलटण तालुक्यासह सातारा जिल्हा हादरला आहे. खून झालेले बहीण भाऊ पारधी समाजातील असल्याची माहिती समोर आलीय. दोघांच्या खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. खून कोणी आणि का केले असावेत याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पंचनामा केला जात आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस व फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. हा खून कोणी व का केला याचा पोलिस तपास करत आहेत. दोघांचेही मृतदेह फलटण येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत .दोघे पारधी समाजातील असून खुनाचं कारण आणि आरोपींना शोधण्याचं काम फलटण पोलिस करतायेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.