Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली स्नेहभोजनावरून मविआत रणकंदन

सांगली स्नेहभोजनावरून मविआत रणकंदन 


मतदानापूर्वी विशाल पाटलांच्या बंडखोरीने सुरु झालेलं सांगलीतील महाभारत अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. त्यातच सांगलीत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत राबलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. पण याच स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील हजर राहिल्याने महाविकास आघाडीत नाराजीनाट्य सुरू झालंय. काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर कारवाई करा अन्यथा विधानसभेत आघाडीत मोडीत काढण्याचा इशारा ठाकरे गटानं दिलाय.


विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांची हकालपट्टी करा. नाहीतर सांगलीत आघाडी होणार नाही, असं ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी म्हटलं आहे. याला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलंय. तर शिवसेना नेत्यांनी तक्रार असल्यास आपल्या नेत्यांकडे बंद खोलीत करावी, असा टोला लगावलाय.

सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. पण काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत चंद्रहार पाटील यांच्यापुढे आव्हान उभं केलं. त्यातच मतदान झाल्यानंतर विश्वजीत कदम यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात आपण कुणाच्या बाजूने हे 4 जूनला कळेल, असं वक्तव्य केलं. त्यात काँग्रेसच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटील दिसल्यामुळे सांगली मविआत महाभारत सुरू झालंय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.