Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कन्हैया कुमारांना दिल्लीत मारहाण :, नेमकं काय घडलं?

कन्हैया कुमारांना दिल्लीत मारहाण :, नेमकं काय घडलं?


काँग्रेसचे ईशान्य दिल्लीतील लोकसभा उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर शुक्रवारी (ता. 17) हल्ला  झाला. ते मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार करत होते. त्यावेळी त्यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे आरोपी पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने कन्हैया यांच्याजवळ गेले होते. 

कन्हैया कुमार हे आपल्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत होते त्यावेळी त्यांच्यासोबत इंडिया आघाडीतील काही नेते होते. यावेळी कुमार यांना पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने काही लोक त्यांच्याजवळ आले. जवळ येताच त्यांनी कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला केला. यावेळी आरोपींनी आपच्या नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशी गैरवर्तन केले. या घटनेबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीत, कन्हैया कुमारांना मारहाण करणाऱ्या लोकांनी त्यांच्याकडील शाल हिसकावून नेली. तसेच त्यांच्या पतीला बाजूला नेऊन धमकावल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी प्रचार करणाऱ्या लोकांवर काळी शाई फेकली आहे. तसेच यावेळी झालेल्या झटापटीत इतर तीन-चार लोकही जखमी झाले आहेत. यात महिलांचा समावेश असल्याचाही शर्मांनी म्हटले आहे. दरम्यान, ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे कन्हैया कुमार हे भाजपचे मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.