Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदी पुन्हा सतेत आले, तर पवार, सुप्रिया, उद्धव आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये जावे लागेल :,केजरीवाल यांचं " भाकीत "!!

मोदी पुन्हा सतेत आले, तर पवार, सुप्रिया, उद्धव आदित्य ठाकरे यांना जेलमध्ये जावे लागेल :,केजरीवाल यांचं " भाकीत "!!


मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालयांना दारू घोटाळ्यात जेलमध्ये जावे लागल्यानंतर त्यांना आपल्या इंडी आघाडीतले बाकीचे नेतेही जेलमध्ये जातील, अशी "स्वप्ने" पडून ते तशी "भाकिते" करायला लागले आहेत. भिवंडीतल्या इंडी आघाडीच्या प्रचार सभेतच त्यांनी असले "भाकीत" करून टाकले. मला 2 जूनला परत जेलमध्ये जावे लागणार आहे, पण 4 जूनला मोदी पुन्हा सत्तेवर आले, तर शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनाही जेलमध्ये जावे लागेल, असे अरविंद केजरीवाल इंडी आघाडीच्या सभेत म्हणाले. केजरीवालांच्या या वाक्यावर शरद पवार हसले.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पण त्यावेळी केजरीवाल असं काही बोलले की, शरद पवारांना देखील खदकन हसले. अरविंद केजरीवाल म्हणाले, जर मोदी पुन्हा सत्तेवर आले तर सुप्रिया सुळे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सगळ्यांना जेलमध्ये जावे लागेल. केजरीवालांचे वक्तव्य ऐकून शरद पवार खदकन हसले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी चुळबूळ केल्याने शरद पवारांनी कार्यकर्त्यांना खाली बसण्याचे आवाहन केले. पण नंतर केजरीवालांनी सभेचा नूर पकडून शरद पवारांची स्तुती केली.

अरविंद केजरिवाल देशाला वाचवण्याची भीक मी तुमच्यासमोर मागायला आलोय. मी स्वत:साठी मते मागायला आलो नाही. मी एवढ्या लवकर सुटेल, याची मला अपेक्षा नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने मला 21 दिवसासाठी जामीन दिल्यामुळे मला त्यांचे आभार मानायचे आहेत. त्यांनी मला जेलमध्ये पाठवलं. दिल्लीत मी गरिबांच्या मुलांना शिक्षण दिलं, त्यामुळे मला अटक करण्यात आली. मोदींना वाटत नाहीये की गरिबांच्या मुलांनी शिकावं!!

मी मधुमेहाचा रुग्ण आहे. पण तुरूंगात असताना यांनी मला 15 दिवस गोळ्या दिल्या नाही. मला माहिती नाहीये, यांना माझ्यासोबत काय करायचं होतं??, नरेंद्र मोदी स्वत:साठी मते मागत नाहीत, तर अमित शहा यांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत आहेत. भाजपच्या मोठ्या नेत्यांना बाजूला केलं गेलं. देवेंद्र फडणवीस, शिवराजसिंग चौहान, वसुंधरा राजे यांना बाजूला केलं गेलं. सगळे गेले पण फक्त योगी आदित्यनाथ यांना धक्का लागला नाही. दोन महिन्यानंतर योगी आदित्य युपीचे मुख्यमंत्री असणार नाहीत!!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.