Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तलाठयासाठी लाच घेणाऱ्यास रंगेहात पकडले! एलसीबीची कारवाई

तलाठयासाठी लाच घेणाऱ्यास रंगेहात पकडले! एलसीबीची कारवाई 
बारामतीत आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन हजार रुपयांची लाच तलाठ्यासाठी स्वीकारताना चंद्रकांत पर्वत जावळकर या खाजगी इसमाला रंगेहाथ पकडले. एसीबीच्या कारवाईने बारामतीत खळबळ उडाली आहे. बारामतीत फक्त वारस नोंदी लावण्यासाठी लाच मागायला लावणारे तलाठी कार्यालय कोणते? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

तक्रारदाराच्या सासऱ्याच्या नावावरील कसबा येथील जागेवर तक्रारदाराच्या पत्नीची वारस म्हणून नोंद लावण्यासाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही नोंद लावण्यासाठी खाजगी इसम चंद्रकांत जावळकर याने तलाठ्याच्या करिता पाच हजार रुपयांची लाच मागणी केली होती, अशी तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली, तेव्हा खाजगी एजंट चंद्रकांत जावळकर याने बारामतीच्या तलाठ्यासाठी तक्रारदाराकडे पत्नीची वारस नोंद करण्यासाठी पंचायत समक्ष तडजोड करून चार हजार रुपयांची लाच मागितली आणि तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची प्रत्यक्ष लाच घेताना चंद्रकांत जावळकर याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे. दरम्यान ज्या तलाठ्यासाठी या जावळकर याने ही लाच मागितली तो तलाठी कोण? त्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान चर्चा अशीही झाली की, वाघर लावली.. अन् वाघरीत फक्त ससाच अडकला..!

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.