Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे :-किळसवाणी घटना! पत्नीच्या चारित्रव्यावर संशय! पतीने लावले गुप्पतांला लावले कुलूप

पुणे :-किळसवाणी घटना! पत्नीच्या चारित्रव्यावर संशय! पतीने लावले गुप्पतांला लावले  कुलूप 


चारित्र्याच्या संशयावरून मारहाण, छळ झाल्याच्या अनेक घटना आपण पाहतो आहोत. कित्येक घटस्फोटही होत आहेत. कित्येक मुलींना चारित्र्याच्या संशयावरून नांदवले जात नाही.गुप्तांगाला लावले कुलूप  पण काही काही घटना एवढ्या किळसवाण्या असतात की, विचारता सोय नाही.
घटना पिंपरी चिंचवड शहरातील आहे. दररोज पत्नीवर चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीने हा खटका कायमचा मिटवावा म्हणून जे कृत्य केले आहे ते अतिशय संतापजनक आहे. त्याने पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूने छिद्र पाडून चक्क कुलूप लावले. ही घटना उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी या महिलेच्या 30 वर्षीय पतीला अटक केली आहे. 
नेपाळमधून गुरखा काम करण्यासाठी आलेल्या दांपत्याशी संबंधित श ही घटना 11 मे रोजी घडली. यानंतर पिढीतेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 16 मे रोजी पीडित पत्नीने पोलिसांकडे फिर्याद दिली. व्यवसायाने गुरखा असलेला हा नेपाळी पती एका सोसायटीमध्ये वॉचमनचे काम करतो. त्याचा त्याच्या पत्नीवर संशय होता. दोघांची यावरून भांडणे होत होती. 

11 मे रोजी देखील रात्रीच्या वेळी अशीच भांडणे झाली. यामध्ये बाचाबाची सुरू झाली, तेव्हा या पतीने ब्लेडच्या साह्याने पीडित महिलेच्या गुप्तांगावर वार केले. ओढणीच्या साह्याने पत्नीचे हात बांधले आणि लोखंडी खिळ्याने गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला छिद्र घेऊन त्यात पितळेचे कुलूप बसवलं. यात गंभीर दुखापत झालेल्या पत्नीला रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.