Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री म्हणाले, कोण आदित्य ठाकरे?तुमचे सुपुत्र ज्यानां चहा - नाष्टा आणून देतात तेच :, सुषमा अंधारे

मुख्यमंत्री म्हणाले, कोण आदित्य ठाकरे?तुमचे सुपुत्र ज्यानां चहा - नाष्टा आणून देतात तेच :, सुषमा अंधारे 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'कोण आदित्य ठाकरे' असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "लोकसभेच्या निवडणुकीसाठी काल मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केले ते लोकसभेसाठी होते की ग्रामपंचायतीसाठी होते कळायला मार्ग नाही. 'आदित्य कोण आहे?' असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, आदित्य तेच आहेत ज्यांना श्रीकांत शिंदे जूस आणि नाश्त्याची सोय करत होते", असे प्रत्युत्तर सुषमा अंधारे  यांनी दिले आहे. 


नामांतराचा हा निर्णय उद्धव साहेबांनी आधीच घेतला होता

सुषमा अंधारे म्हणाले, नामांतराला आमचा विरोध आहे, म्हणणाऱ्यांवर मी फक्त हसू शकते. इथल्या नामांतराचा पहिला निर्णय कुणी घेतला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कसे चांगले आहोत हे दाखवण्यासाठी नौटंकी करायची. अनेक न्यायाधीशांनी आधीच सांगितलय की, आमच्यावर दबाव आहे. नामांतराचा हा निर्णय उद्धव साहेबांनी आधीच घेतला होता. श्रेयवादाचे राजकारण करण्यासाठी हे सुरु आहे. 

विकासावर ज्यांना बोलत येत नाही तर हिंदू मुस्लिम करू लागले

शरद पवार यांचे विधान म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठू नये, त्यांच्या बोलण्याचे अर्थ भले भले लागू शकत नाहीत. विकासावर ज्यांना बोलत येत नाही तर हिंदू मुस्लिम करू लागले. आता ओवैसी पाहिले तार्किक बोलायचे आता तेही काहीही बोलू लागले. मतदानाची टक्केवारी कमी होत आहे, त्याला शिंदे -फडणवीस- अजित पवार यांची दादागिरी जबाबदार आहेत. यांच्यामुळे आमच्या एका कार्यकर्त्याने परांडा तालुक्यात जीव गमावला, असा आरोपही अंधारे  यांनी केला. 

शहिदांचा अपमान करणारी काँग्रेस आहे, असं शिंदे म्हणाले, निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्र्यांची तक्रार करायला हवी. औरंग्याची कबर उद्धव ठाकरेंनी सजवली असेही ते बोलले. जाणीवपूर्वक हिंदु मुस्लिम तेढ निर्माण करणारे ही वक्तव्य आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर कारवाई करावी. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आम्ही तक्रार करणरा आहोत. तुमचे मोदीजी पत्रकारांना सामोरे का जात नाहीत? मोदीजींना बिळातून बाहेर यायची भीती वाटते का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.