🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसला काळा पैसा पुरवला,ईडीने अंबानी - अदानी यांच्यावर कारवाई करावी :, संजय राऊत यांची मागणी

काँग्रेसला काळा पैसा पुरवला,ईडीने अंबानी - अदानी यांच्यावर कारवाई करावी :, संजय राऊत यांची मागणी 


अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना, भारतीय व्यावसायिक गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यांनी प्रथमच उघडपणे असे आरोप केल्याने, मोदींच्या वक्तव्याचा आधार घेऊन ईडीने कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

राहुल गांधींना काळा पैसा पुरवला

संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या (बुधवार, 7 मे) दोन सभांमध्ये काँग्रेस पक्षावर टीका केली. ती टीका करत असताना त्यांनी एक आरोप केला. ते म्हणाले, उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या काळ्या पैशावर काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष) ही लोकसभा निवडणूक लढवत आहे. या दोन उद्योगपतींनी राहुल गांधी यांना टेम्पो भरुन काळा पैसा पुरवला आहे. हे देशाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन ईडीने अदानी-अंबानींना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.