Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजबच! आई - वडिलांनी 'या ' गोंडस बाळाचं असं विचित्र नाव :, वाचतानाही वाटेल लाज


अजबच! आई - वडिलांनी 'या ' गोंडस बाळाचं असं विचित्र नाव :, वाचतानाही वाटेल लाज 


मुंबई : बाळाची चाहूल लागताच ते आईच्या पोटात असल्यापासूनच त्याच्या नावाची तयारी सुरू होते. मुलगा झाला तर हे नाव, मुलगी झाली तर हे नाव अशी नावांची यादीच तयार असते. नावात काय आहे, असं म्हणतात.

पण खरंतर नावातच सर्वकाही असतं हे नंतर समजतंच. अशाच एका बाळाचं नाव सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या बाळाच्या पालकांनी त्याचं नाव इतकं विचित्र ठेवलं आहे की तुम्हाला वाचायलाही लाज वाटेल.

आपल्या बाळाचं नाव सर्वांपेक्षा वेगळं, हटके असावं असं प्रत्येक पालकांना वाटतं. पण काही वेळा काहीतरी युनिक नाव ठेवण्याच्या नादात काहीही नाव ठेवलं जातं. अशाच एका दाम्पत्याने आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचं नावही सर्वांना सांगितलं आहे. सोशल मीडिया रेडिटवर ही पोस्ट करण्यात आली आहे.


बाळाचं नाव वाचून सर्वजण हैराण

बाळाचं नाव वाचून सर्वजण हैराण झाले आहेत. काहींनी या नावाची खिल्ली उडवत इतिहासातील सर्वात वाईट, हास्यास्पद नाव म्हटलं आहे. तर काहींनी इतके क्रूर आईवडील कधी पाहिले नाहीत असं म्हणत पालकांवर संताप व्यक्त केला आहे. आता इतिहासातील सर्वात वाईट आणि पालकांना क्रूर ठरवणारे बाळाचं हे नाव नेमकं आहे तरी काय? तुम्हालाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल.


काय आहे बाळाचं नाव?

तुम्ही पोस्टमध्ये पाहाल तर गोंडस बाळाचा फोटो दिसतो. याच फोटोखाली या गोंडस बाळाचं नाव मात्र तितकंच विचित्र आहे. तुम्ही स्पेलिंग वाचली तर Pheart असं हे नाव आहे. वाचताच त्याचा उच्चार फार्ट असाच येतो. काहींनी याचा उच्चार फर्ट असा केला आहे.

u/isocleat रेडिट अकाऊंटवरील ही पोस्ट आहे. पोस्ट पाहण्यासाठी इथं क्लिक करा. बाळाचं असं नाव वाचताच त्यावरून वाद सुरू झाला आहे. दरम्यान काहींनी पालकांची पहिली भाषा इंग्रजी नसावी असाही अंदाज व्यक्त केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.