Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूरात डंपरच्या धडकेत महिला कर्मचारी ठार

कोल्हापूरात डंपरच्या धडकेत महिला कर्मचारी ठार 


डंपरची अॅक्टीव्हा मोपेडला जोरदार धडक बसून पेठवडगाव कोर्टातील स्टेनो टायपिस्ट कर्मचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शिये -कसबा बावडा रस्त्यावरील शिये फाटा येथे बुधवारी (दि.८) सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. ही महिला कोर्टातील कामकाज उरकून बावड्यातील घरी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. वैशाली अजित पोळ ( वय २८ रा. मराठा काॅलनी कसबा बावडा ) असे या महिलेचे नाव आहे.

वैशाली ही महिला पेठवडगाव कोर्टात स्टेनो टायपिस्ट ( क्लार्क ) म्हणून नोकरी करत होती. आज (बुधवारी) सायंकाळी सहा वाजता कोर्टातील कामकाज उरकून आपल्या अॅक्टीव्हा मोपेडवरून ( क्र. एम एच 0९ ई एन ८१५८) ती घरी जात होती. शिये फाटा येथे आल्यावर डंपरने पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात डंपरचे चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने वैशालीचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, तिच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन मेंदू रस्त्यावर विकरूला गेला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिल्यानंतर डंपरनेच धडक दिल्याचे फुटेजमध्ये दिसून आले, मात्र डंपरचा नंबर मात्र अस्पष्ट दिसत आहे . या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.