Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला :, भाजप नेता ठार

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला :, भाजप नेता ठार 


काश्मीरमध्ये शनिवारी (दि.१९) रात्री उशिरा दहशतवाद्यांनी दोन ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात भाजपचे नेते आणि माजी सरपंच ठार झाले असून जयपूरमधील पर्यटक जोडपे जखमी झाले आहे. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे.


शोपियांच्या हुरपोरा गावात दहशतवाद्यांनी भाजपचे माजी सरपंच एजाज अहमद शेख यांच्यावर गोळीबार केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी पहलगामजवळील येनेरमध्ये जयपूरच्या फरहा आणि तबरेझ दाम्पत्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दोघांनाही जवळून गोळी झाडल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. हे दोघे येनार येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी आले होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला, असे पोलिसांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.