Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरात देवपूजा करताना किती अगरबत्ती लावाव्या? जाणून घ्या 'हा' नियम

घरात देवपूजा करताना किती अगरबत्ती लावाव्या? जाणून घ्या 'हा' नियम 


प्रत्येकाच्या घरात दररोज देवपूजा केली जाते. लोक सकाळी उठतात, आंघोळ करतात आणि पहिलं आपल्या देवतेची पूजा करतात. पूजेदरम्यान लोक देवाला हळद, कुंकू, फुलं इत्यादी अर्पण करतात. यासोबतच अगरबत्ती लावून आरती केली जाते. आरती नेहमी पूजेनंतर शेवटी केली जाते, जेणेकरून पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर देव त्याला क्षमा करू शकेल. आरती केल्याशिवाय पूजा सफल होत नाही. शास्त्रात आरतीशी संबंधित काही नियम  सांगण्यात आले आहेत.

किती अगरबत्ती लावाव्या? 

शास्त्रानुसार, आरती करताना अगरबत्ती, कापूर किंवा वात किती आहेत याकडे लक्ष द्यावं. शास्त्रानुसार, जेव्हाही तुम्ही धूप किंवा अगरबत्तीने देवाची आरती कराल, तेव्हा त्याची संख्या नेहमी विषम असावी. 3,5,7 किंवा 9 प्रमाणे. जर तुम्ही धूप लावत असाल तरी ती संख्या विषम ठेवावी.

आरतीचं ताट किती वेळा ओवाळावं?
शास्त्रात देवाची आरती करण्याबाबतही माहिती देण्यात आली आहे. सर्वप्रथम देवाच्या चरणी चार वेळा आरती ओवाळावी, नाभीत दोनदा आणि तोंडासमोर एकदा आरतीचं ताट ओवाळावं आणि त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आरती करावी. म्हणजे एकूण 14 वेळा आरती करावी.

आरती करताना दिव्याला फार महत्त्व
तुपाच्या दिव्याने आरती करणार्याला स्वर्गलोकात स्थान मिळतं, असे भगवान विष्णूंनी शास्त्रात सांगितलं आहे. कापूर लावून आरती करणार्याला अनंतात प्रवेश मिळतो आणि जो व्यक्ती पूजेनंतर आरती केलेल्या ताटाचं दर्शन करतो त्याला परमपदाची प्राप्ती होते.
हे देखील लक्षात ठेवा

तसेच आरतीचा दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये याची विशेष काळजी घ्यावी. आरतीपूर्वी आणि नंतर दिवा ताटात खाली ठेवा आणि नंतर तो उचला. दिवा लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.

लाकडी देव्हाऱ्यात धूळ, माती किंवा वाळवी लागू देऊ नका
घरातील देव्हारा हा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे. लाकडी देव्हाराात कुठेही धूळ, माती किंवा वाळवी असू नये, याची काळजी घ्यावी, यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. लाकडी देव्हारा जुना झाल्यावर त्यावर वाळवी लागू देऊ नका, देव्हाऱ्याची वेळोवेळी तपासणी करावी. 
(टीप : वरील सर्व बाबी ' सांगली दर्पण' केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून ' सांगली दर्पण 'कोणताही दावा करत नाही.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.