Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कार अपघात प्रकरणाला नंव वळण, आरोपीची पोलिसांना धक्कादायक माहिती

कार अपघात प्रकरणाला नंव वळण, आरोपीची पोलिसांना धक्कादायक माहिती 


पुण्यात रविवारी भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने  दोघांना उडवलं, या घटनेत दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने काही तासांत जामीन मंजूर केला. मात्र या मुलाच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडिलांनीच मला पार्टीसाठी परवानगी दिल्याचं या मुलानं म्हटलं आहे. मी कार चालविण्याचं रीतसर प्रक्षिण घेतलेलं नसतानाही वडिलांनी त्यांची पोर्श कार मला चालवायला दिली असा धक्कादायक खुलासाही या मुलानं केला आहे.

नेमकं काय म्हटलं? 
रविवारी पुण्यात भीषण कार अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दुचाकीवर असलेल्या दोघांना चिरडलं. यामध्ये इंजिनिअर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. आता या प्रकरणात अल्पवयीन आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे. 'वडिलांनीच मला पार्टीसाठी परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहित होतं. मी कार चालविण्याचं रीतसर प्रक्षिण घेतलेलं नसतानाही वडिलांनी त्यांची पोर्श कार मला चालवायला दिली' अशी धक्कादायक माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? 

पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलानं पोर्श कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं. यामध्ये इंजिनिअर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली आहे. या घटनेनंतर पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.