Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात दोघानं चिरडणाऱ्या अलिशान पोर्षे कारचे फिचर्स माहिती आहे का? किंमत पाहून थक्क व्हाल

पुण्यात दोघानं चिरडणाऱ्या अलिशान पोर्षे कारचे फिचर्स माहिती आहे का? किंमत पाहून थक्क व्हाल 


पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्शे या अलिशान गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले.

अल्पवयीन मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोर्शे ही आलिशान गाडीदेखील चर्चेत आली आहे. या निमित्तानेच आज आपण आलिशान पोर्शे कारचे फीचर्स, किंमत याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

कारचे फीचर्स पाहा
भारतीय बाजारात लक्झरी कारची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. या कारची तरुणांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. बाजारात एकापेक्षा एक जबरदस्त लक्झरी कार पाहायला मिळतात. प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Porsche India ने Porsche Taycan ही कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. पोर्शे कारची गणना लक्झरी कारमध्ये केली जाते. Porsche ची ही कार दिसायला अत्यंत आकर्षक आहे. 

पोर्शे टायकनमध्ये मॅट्रिक्स डिझाइन एलईडी हेडलाइट्स आहेत. तर टर्बो मॉडेल्समध्ये मानक एचडी-मॅट्रिक्स डिझाइन एलईडी हेडलाइट्स बसवण्यात आले आहेत. कारमध्ये ३६०-डिग्री व्ह्यू कॅमेराची सुविधा देखील आहे. पोर्शे कारमध्ये १०.९-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जो नेव्हिगेशन सिस्टम आणि इन्फोटेनमेंट सिस्टम वैशिष्ट्ये प्रदान करतो. 

Porsche Taycan ही उत्तम वैशिष्ट्ये असलेली कार आहे. ही कार ३०० kW किंवा ४०८ PS ची पॉवर जनरेट करते. पोर्शे कारचा टॉप स्पीड २३० kmph आहे. तर ही कार ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी ४.८ सेकंद घेते. या कारच्या परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानावर खूप काम केले गेले आहे.

या वर्षी मार्चमध्ये पोर्शे टायकनचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात दाखल झाले होते. Porsche Taycan Turbo GT ही एक शक्तिशाली आणि वेगवान कार आहे. ही कार केवळ २.१ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. जर्मन कार निर्मात्याचा दावा आहे की ही, कार ३०५ किमी प्रतितास इतका वेग देते.
कारची किंमत किती?

पोर्शे कार लोकांना आलिशान अनुभव देतात. या कारच्या पॉवर आणि फीचर्समुळे या कारची किंमत करोडो रुपयांच्या घरात जाते. Porsche Taycan ची एक्स-शोरूम किंमत १.६१ कोटी रुपयांपासून सुरू होते आणि २.४४ कोटी रुपयांपर्यंत जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.