Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढल्या :, विशेष न्यायालयात पंतप्रधानांविरोधात खाजगी तक्रार दाखल

नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढल्या :, विशेष न्यायालयात पंतप्रधानांविरोधात खाजगी तक्रार दाखल 


बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याविरोधात बंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष दंडाधिकारी न्यायालयात  एक खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधानानी मुस्लिमांना घुसखोर संबोधले आणि काँग्रेस  सत्तेवर आल्यास ते देशातील मुस्लिमांना  संपत्तीचे पुनर्वितरण करतील, असे द्वेषयुक्त भाषण केल्याचा आरोप या तक्रारीत आहे. 

हेब्बाळ येथील रहिवासी झियाउर रहमान नोमानी यांनी बंगळूरच्या ४२ व्या अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयात ही खासगी तक्रार दाखल केली आहे. त्यात समाजात द्वेष पसरवल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे. 

प्रचाराच्या भाषणादरम्यान समाज आणि धर्म यांच्यात द्वेष निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आणि गुन्हेगारी भडकावणे यासाठी आयपीसी कलम १५३ ए, १५३ बी, २९५ ए, ५०३, ५०४, ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल करण्याचे अमृतहळ्ळी पोलिसांना  निर्देश द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.