Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खळबळजनक! 'या ' प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या

खळबळजनक! 'या ' प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या


बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण अजूनही संपलेलं नाही. सलमान खान गोळीबार प्रकरण ताज असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

जॉनी व्हॅक्टर असं अभिनेत्याचं नाव आहे. लॉस एंजेलिसमध्ये जॉनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जॉनीच्या मृत्यूनंतर हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी सकाळी 3 वाजता जॉनीवर हल्ला झाला.ज्यात त्याची हत्या करण्यात आली आहे. काही चोरटे घुसले आणि त्यांनी जॉनीच्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न केलं. जॉनीनं ते पाहिलं आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चोरांनीं जॉनीची गोळ्या घालून हत्या केली अशी माहिती अभिनेता जॉनीची आई स्कारलेट यांनी दिली आहे.

अभिनेता जॉनीच्या मृत्यूनंतर हॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्याचा मृत्यू अत्यंत धक्कादायक होता. वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी जॉनीचा मृत्यू झाल्यानं त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक हॉलिवूड कलाकार आणि चाहत्यांनी जॉनीला श्रद्दांजली वाहिली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.