Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'कंगना गो बॅक', 'कंगना वंगना नही चलेगी', दलाई लामा यांच्या विरोधातली पोस्ट भोवली कंगनाच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत दगडफेक

'कंगना गो बॅक', 'कंगना वंगना नही चलेगी', दलाई लामा यांच्या विरोधातली पोस्ट भोवली कंगनाच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत दगडफेक 


हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत यांना काजा येथे काळे झेंडे दाखविण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेशमधील काजा येथे जाहीर सभेसाठी आल्या असताना कंगना रणौत यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला.

'कंगना गो बॅक', 'कंगना वंगना नही चलेगी', अशा घोषणा त्यांच्याविरोधात देण्यात आल्या. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात तिबेटमधील धर्मगुरू दलाई लामा यांच्या विरोधात पोस्ट लिहिल्याने कंगना रणौत यांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कंगना रणौत यांनी एक्स अकाऊंटवर दलाई लामा यांच्यावरील एक मिम मागच्या वर्षी शेअर केले होते. 'दलाई लामा यांचे व्हाईट हाऊसमध्ये सहर्ष स्वागत', असे कॅप्शनही त्याला देण्यात आले होते.

दलाई लामा यांचा एक एडिट केलेला फोटो कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांची जिभ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना लावलेली दाखविण्यात आली होती. यावर कंगना रणौतने लिहिले होते, 'दोघांनाही एकच आजार आहे. हे दोघे नक्कीच मित्र असणार.' या पोस्टनंतर बौद्ध धम्माच्या काही गटांनी कंगना यांच्या मुंबईतील घराबाहेर आंदोलन केले होते. सोशल मीडिया पोस्टवरून वाद उफाळल्यानंतर कंगना रनौत यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. जो बायडेन आणि दलाई लामा हे चांगले मित्र आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न विनोदाद्वारे केला होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
काजा येथे कंगना रणौत यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते जय राम ठाकूर यांनी काँग्रेसवर पलटवार केला. काँग्रेसने आमची जाहीर सभा उधळण्याचा प्रयत्न केला, तसेच आमच्या ताफ्यावर दगडफेक केली, असा आरोप जय राम ठाकूर यांनी केला. ते म्हणाले, 'काँग्रेस आणि भाजपा पक्षांना एकाचवेळी निवडणूक प्रचार सभा घेण्याची परवानगी देणे चुकीचे आहे. काँग्रेसच्या आधी भाजपाला याठिकाणी प्रचार सभा घेण्याची परवानगी मिळाली होती. मात्र काँग्रेसने आमची सभा होऊ नये, असा प्रयत्न केला. यासाठी आमच्याविरोधात घोषणाबाजी करणे, दगड फेकणे आणि ताफा अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.'

दरम्यान काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह यांनी मात्र या प्रकरणावर भाजपावरच टीका केली. ते म्हणाले, दक्षिण भारतात भाजपाचा सुपडा साफ झाला आहे. तर उत्तर भारतात भाजपाच्या निम्म्या जागा कमी होतील. भाजपा २०० जागांचाही आकडा पार करू शकणार नाही. देशात इंडिया आघाडीचे मजबूत सरकार स्थापन होईल. हिमाचल प्रदेशमधील सर्व चार लोकसभा मतदारसंघ आणि सहा विधानसभा मतदारसंघात चांगली कामगिरी करू.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.