Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉक्टरांची निष्काळजी पणा :, प्रसूतीनंतर आई मुलाचा दुर्दिवी मृत्यू

डॉक्टरांची निष्काळजी पणा :, प्रसूतीनंतर आई मुलाचा दुर्दिवी मृत्यू 


जळगाव :- प्रसुती झालेल्या मातेने नवजात गोंडस बाळाला जन्म दिला, परंतु काही वेळातच त्या नवजात शिशूचा मृत्यू झाला. बाळ दगावून दोन दिवस होत नाही तोच श्रद्धा जयेश सूनसोतकर (वय २८, रा. पहूर कसबे, ता. जामनेर) या मातेचाही सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, दोघ मायलेकांचा मृत्यू खासगी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे श्रद्ध सूनसोतकर या महिला वास्तव्यास असून त्या गर्भवती होत्या. त्यांना दि. ४ जून प्रसूती तारीख दिली होती. दि. १८ मे रोजी तिला उपचारासाठी तारा हॉस्पिटल येथे तिचे पती जयेश यांनी नेले. नातेवाईकांना पूर्व सूचना न देता तिची दुपारी २ वाजता सोनोग्राफी केली. त्यानंतर तिला अॅडमिट करण्याचे सांगितले. त्यानुसार जयेश सूनसोतकर यांनी पत्नीला त्याठिकाणी दाखल केले. दुपारी सव्वा दोन वाजता त्या महिलेचे सिझर केल्यानंतर त्या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु बाळाची नाळ कापल्यानंतर त्याला श्वास घेता येत नसल्याने त्याचा काही वेळताच दुर्देवी मृत्यू झाला. मात्र बाळाच्या आईची प्रकृती ठिक असल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले. मध्यरात्री खालावली महिलेची प्रकृती दोन तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रसुती झालेल्या महिलेची प्रकृती चांगली होईल असे नातेवाईकांना सांगण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक महिलेची प्रकृती खालावली.
महिलेची प्रकृती दोन तीन दिवस उपचार घेतल्यानंतर प्रसुती झालेल्या महिलेची प्रकृती चांगली होईल असे नातेवाईकांना सांगण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक महिलेची प्रकृती खालावली. यावेळी तारा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास महिलेला अन्य ठिकाणी दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईकांनी रविवारी पहाटे पाच वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला .

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.