Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

होय मी दारू पितो, पप्पानीचं मला गाडी दिली! अपघातातील आरोपी मुलाची धक्कादायक कबुली

होय मी दारू पितो, पप्पानीचं मला गाडी दिली! अपघातातील आरोपी मुलाची धक्कादायक कबुली 


पुण्यातील कार अपघात प्रकरणातील आरोपी तरुणाने तो दारू पीत असल्याचे मान्य केले आहे. ही बाब त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना महिती असल्याचे त्याने संगितले. ऐवढेच नाही तर त्याने कार चालवण्याचे रीतसर प्रशिक्षण देखील घेतले नाही आणि तरी देखील त्याला वडिलांनी त्यांच्याकडे असलेली ग्रे रंगाची पोर्श कार दिली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विशाल अग्रवाल यांना आज सकाळी संभाजीनगर येथून अटक केली आहे. तर बार मालकाला देखील अटक करण्यात आली आहे. हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांना देखील आज अटक करण्यात आली आहे. या अपघातात अनिस अवधिया व अश्विनी कोस्टा हे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले.

या प्रकरणी माहिती देतांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आरोपी मुलगा हा अल्पवयीन आहे. त्याच्या जन्माचा पुरावा देखील मिळाला आहे. तर मुलाला न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात अपील करणार असल्याचे देखील आयुक्त म्हणाले. अल्पवयीन मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती, तर तिचे रजिस्ट्रेशन देखील नव्हते. अपघातग्रस्त कार ही मुंबई डीलरने रजिस्ट्रेशन न करताच दिली आहे. त्यामुळे डीलरच्या ट्रेड सर्टिफिकेटवर कारवाई होऊ शकते, असे देखील आयुक्त म्हणाले.

कुटुंबियांचा आक्रोश

अश्विनी व अनिस यांच्या कुटुंबीयांनी मुलांचे मृतदेह पाहताच आक्रोश केला. अश्विनी ही मूळची मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहे. तर अनिसची आई-वडील वृद्ध असून, अनिस हा त्यांचा एकमेव मुलगा होता. दोघांनीही त्यांचे कम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.