Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

होर्डिंग कंपनीचा मालक आखेर भावेश भिडेला पकडलं

होर्डिंग कंपनीचा मालक आखेर भावेश भिडेला पकडलं 


घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत होर्डिंग कंपनीचा फरार मालक भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. युनिट ९ ने उदयपूर येथून भिंडेला ताब्यात घेतले आहे. आपल्या भावाच्या नावे त्याने हॉटेलमध्ये एक खोली घेतली होती. पोलिसांनी त्याचा अचूक माग काढत त्याला जेरबंद केले आहे.

वादळी वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे हे होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपावर कोसळले होते. त्यात १६ लोकांचा मृत्यू झाला. हे होर्डिंग अनधिकृत होते आणि पालिकेची त्याला परवानगी नव्हती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या होर्डिंगला तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारची परवानगी असल्याचा आरोप केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.