Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खासदारांच्या दिलदार शत्रूनेंच पैलवानांचा घात केला :, विशाल पाटील

खासदारांच्या दिलदार शत्रूनेंच पैलवानांचा घात केला :, विशाल पाटील 


सांगली : चंद्रहार पाटील यांचा या निवडणुकीत बळी गेला, याचे दु:ख मलाही आहे. पण, खासदारांच्या दिलदार शत्रूनेच त्यांचा घात केला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले की, भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक षडयंत्रे आखली. ती फसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी भावना खासदार व्यक्त करीत असले तरी याच दिलदार शत्रूशी संगनमत करुन त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

लोकसभा निवडणुकीत षड्यंत्र रचले गेल्यानंतर खासदारांचा आत्मविश्वास वाढला होता. तीन ते चार लाख मतांनी विजयी होऊ, असा आत्मविश्वास त्यांना होता. सांगलीतील जनतेने षड्यंत्र ओळखले. तेव्हापासून खासदारांचा मूड खराब झाला. सांगलीत भाजप कमकुवत झाली आहे. उमेदवारही कमजोर दिला. अशावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपेक्षा ठेवली. त्यांच्या दिलदार शत्रूप्रमाणे इतरांनी मदत करावी, अशी अपेक्षा बाळगली. ते झाले नाही. त्यातूनच ते काँग्रेस नेत्यांवर टीका करताहेत.

विश्वजीत कदम यांच्याशी दोस्ती अतूट

विशाल पाटील म्हणाले, आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काम केले. त्यांच्या पाठीशी दादाप्रेमी जनता उभी आहे. आमची एकी अभेद्य आहे. माझा दोस्त दिलदार आहे, ही दोस्ती आता तुटणार नाही. खासदार त्यांना धमक्या देत आहेत. पण, त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहून अडचणीत धावून येईन.

चंद्रहार यांच्याबद्दल मला सहानुभूती

विशाल पाटील म्हणाले, चंद्रहार पाटील यांचा जिल्ह्यातील एका राजकीय डावात बळी गेला. त्यांच्याबद्दल मला सहानुभुती आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाचे नुकसान होऊ नये, अशी आमची भावना होती. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम याबाबत भिती व्यक्त केली होती. पण, खासदारांच्या दिलदार शत्रूच्या चौकडीने ठरवून चंद्रहार पाटील यांचा वापर केला.

हतबलतेमुळे माझे फोटो व्हायरल

खासदारांकडे चांगले काही सांगण्यासारखे नव्हते. सर्व खेळ्या अपयशी ठरल्यानंतर हतबलतेपोटी त्यांनी माझे काही फोटो व्हायरल केले. फेक न्यूज फिरवल्या. त्याविरोधात आम्ही तक्रारही दाखल केली आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

तुम्ही कधी युतीधर्म पाळला?

विश्वजीत यांना आघाडीधर्म शिकवणाऱ्या संजयकाकांनी कधीच युतीधर्माचे पालन केले नाही. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेला त्यांनी काय केले, हे पक्षालाही माहित आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते कोणाच्या गाडीतून फिरत होते, हेही जनतेला माहित आहे, असे विशाल पाटील यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.