Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माणसाला पंख असते तर? विध्यार्थीने दोन परिछेदात संपवला निबंध, वाचून शिक्षक कोमात.....

माणसाला पंख असते तर? विध्यार्थीने दोन परिछेदात संपवला निबंध, वाचून शिक्षक कोमात.....


सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. हल्ली विद्यार्थ्यांच्या मार्कशीटही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यात विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तर ही इतकी भन्नाट असतात की काही विचारू नका.
सध्या अशीच एक मार्कशीट ही व्हायरल होते आहे ज्यात विद्यार्थ्याने लिहिलेला निबंध व्हायरल होतो आहे. यात लिहिलेला हा निबंध वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. यात विद्यार्थ्यांची क्रिएटिव्ही पाहून सगळे हसून हसून पार वेडे झाले आहे. परंतु हा निबंध वाचून शिक्षकांनाही धक्का बसला असेल, असं आपण मानू खरं पण त्यांनी चक्क विद्यार्थ्याला पैंकीच्या पैंकी गुण दिले आहेत. त्यामुळे अनेकजणं हे शॉक झाले आहेत.

नक्की काय होता निबंध?

यावेळी माणसांना पंख असते तर... यावर एक काल्पनिक निबंध लिहायचा होता. त्यात विद्यार्थ्याने लिहिले की, ''आजकाल आपण समाजात बघतो की, माणसांना पंख नसताना देखील ते दुसऱ्यांवर उडतात. माणसांना जर खरोखर पंख असते तर ते दुसऱ्यांवर अजून जास्त उडाले असते. अशा आहे की समाजातील हे कटु सत्य मी या निबंधात लिहिल्यामुळे सर तुम्ही माझ्यावर उडणार नाही.''

कल्पना आणि निबंध
सध्या या विद्यार्थ्याची ही काल्पनिक मांडणी पाहून शिक्षकांनी त्याला पैंकीच्या पैंकी गुण दिले आहे. निबंध लिहा हा प्रश्न परीक्षेत अगदी हमखास विचारला जातो. त्यातून बोर्डाच्या परीक्षेतही निबंध लिहिणे फार आवश्यक असते. मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात आपल्याला शिकविल्या जाणाऱ्या भाषांचे पेपर सोडविताना आपल्याला निबंध हा लिहावाच लागतो. परंतु असा निबंध पाहून शिक्षकही कोमात गेले. @ag_creation_004 नावाच्या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना यावेळी युझरनं कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ''सरांनी पण न उडता 10 पैंकी 10 मार्क्स दिले आहेत.'', असं कॅप्शन यावेळी शेअर केले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. काहीवेळा विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाची उत्तरे ते अशी देतात की काही विचारूच नका. अशी उत्तरं पाहून तुम्हाला हसू लावल्याशिवाय राहणारच नाही. आपल्या कल्पनेला विद्यार्थी अशी चालता देतात की अशा उत्तरपत्रिका या व्हायरल होतातच होतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.